करोनामुळे पाचवी आणि आठवीची स्कॉलरशीप परीक्षा पुढे ढकलली

0
89

राजेंद्र पाटील राऊत

करोनामुळे पाचवी आणि आठवीची स्कॉलरशीप परीक्षा पुढे ढकलली
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर चिफबिरो जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा करोनाचा प्रादुर्भाव लक्ष घेता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक परिपत्रक काढून माहिती दिली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(८वी) या परीक्षा राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये २३ मे रोजी होणार होत्या.
परीक्षा बाबत:
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी)व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुनही याबद्दल माहिती दिली आहे. याचबरोबर देशातल्याही अन्य महत्त्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणारी जेईई मेन्सची चौथ्या टप्प्यातली परीक्षाही आता स्थगित करण्यात आली आहे.

Previous articleपराग सामाजिक संस्थेच्या वतीने; दिव्यांग व कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटूंबियांना रेशन किटचे वाटप…..
Next articleकेंद्र सरकारने लसीकरण अ‍ॅपचे विकेंद्रीकरण करावे – ना. जयंत पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here