नांदेड जिल्ह्यात कोरोना covid-19 अनुषंगाने नवीन नियमावली जाहीर . जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटणकर

0
48

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210317-WA0092.jpg

नांदेड जिल्ह्यात कोरोना covid-19 अनुषंगाने नवीन नियमावली जाहीर . जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटणकर

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोवीड-19 अर्थात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 31 मार्च 2021 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टारंट, खाद्यगृह, परमिटरूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाटभांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. माञ या निर्णयामुळे वरील आस्थापनांवर उपजिवीका अवलंबून असलेल्यांना अर्थिक अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन तसेच नागरीकांच्या सोयीसाठी वरील आस्थापनांना पार्सल सेवा राञी 10.00 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्याने दि. 31 मार्च 2021 पर्यंत राहतील.

कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारिरीक अंतर राखणे आवश्यक आहे. आपण याची काटेकोर अंमलबजावणी केली तर प्रशासनावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार नाही. कृपया नागरीकांनी वरील ञिसूञीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नांदेड जिल्हा कोरोनामुक्त करण्यात सहभाग नोंदवावा .
महत्वाची सूचना – आपण सर्वांनी एकञ येऊन या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली, आणि कोवीड-19 रूग्णांची संख्या कमी होऊ लागली तर परीस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयांमध्ये दि. 31 मार्च 2021 पूर्वी शिथीलता देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Previous articleहिंदू मुलीला पूस लावून धर्मांतर करून मुलीच्या घरून 25 लाख रुपये आणि 74 तोळे सोने घेऊन मुस्लिम युवक फरार (
Next articleशहाजी राजे भोसले यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here