स्वप्निल जोशी महिलांना बनवणार उद्योजक; मदत मिळवण्यासाठी असा करा संपर्क 🛑

0
48

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210311-WA0084.jpg

🛑 स्वप्निल जोशी महिलांना बनवणार उद्योजक; मदत मिळवण्यासाठी असा करा संपर्क 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕स्त्रियांना व्यवसाय क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. ‘आत्मसन्मान’ (Aatmasamman) असं या नव्या उपक्रमाचं नाव आहे.

स्वप्निल जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनयासोबतच तो सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय असतो. नुकतेच त्याने स्त्रियांना व्यवसाय क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे.

‘आत्मसन्मान’ असं या नव्या उपक्रमाचं नाव आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनादिवशी या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.

हा उपक्रम ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेवर आधारित आहे. ज्या महिलांना स्वतःची उत्पादनं विकायची आहेत, किंवा ज्यांच्याकडे स्वत:ची उत्पादनं नाहीत, पण व्यापार मात्र करायचा आहे. अशा स्त्रियांना ‘आत्मसन्मान’ हा उपक्रम एक ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय ज्यांच्याकडे स्वतःचे भागभांडवल नाही. त्यांना देखील या उपक्रमाद्वारे आर्थिक मदत मिळणार आहे.

उत्पादनाची दर्जा तपासणी करणं, त्यांची छायाचित्रे काढून ती वेबवेबसाईटवर टाकणं, आवश्यक ते इंटरनेट तसेच भाषाज्ञान महिलांना देणं ही सर्व मदत ‘आत्मसन्मान’तर्फे केली जाणार आहे.

‘आत्मसन्मान’ या उपक्रमाशी जोडलं जाण्यासाठी आणि अधिक माहिती व नोंदणीसाठी महिला उद्योजकांनी येथे संपर्क साधावा – ८७६७६६३६३४
मंजुषा पैठणकर या ‘इम्परेटीव्ह बिझनेस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्या ‘आत्मसन्मान’बद्दल म्हणाल्या, “समाजातील आणि सर्वच स्तरांमधील महिला आपले कुटुंब आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या शतकानुशतके विनासायास आणि समर्थपणे सांभाळत आल्या आहेत.त्या आघाडीवर त्यांचे कर्तृत्व वादातीतच आहे आणि त्यात त्यांच्यातील उद्यमशिलतेचे एक अंग लपलेले असते.

त्यांच्या या उद्यमशिलतेला एक हक्काचे व सन्मानाचे व्यासपीठ असावे असा विचार मनात आला आणि ‘आत्मसन्मान’ या ई-कॉमर्स पोर्टलची निर्मिती झाली. त्याद्वारे सामील होणाऱ्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवलं गेलं आहे.”.⭕

Previous articleखेड तालुक्यातील मदत ग्रुप यांच्यावतीने स्त्री शक्तीचा सन्मान
Next articleपुढच्या काही दिवसांमध्ये पुण्यात “हे” निर्बंध घालावे लागतील; महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here