नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

0
56

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210307-WA0072.jpg

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

राजेश एन भांगे / युवा मराठा न्युज नेटवर्क

जिल्ह्यात ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २२ मार्च, २०२१ रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्ह्यात सोमवार ८ मार्च २०२१ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २२ मार्च २०२१ रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here