🛑 मुंबई गोवा महामार्गावर मृत्युंजय दूत संकल्पनेचा शुभारंभ 🛑

0
102

🛑 मुंबई गोवा महामार्गावर मृत्युंजय दूत संकल्पनेचा शुभारंभ 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:-⭕ मुंबई गोवा महामार्गावरील वाहनांचे वाढते प्रमाण पाहता घडणाऱ्या अपघातात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या रोज वाढत असते.याचा विचार करता “मृत्युंजय दूत” संकल्पनेचा शुभारंभ कशेडी घाट येथे खेडचे डॉक्टर उपेंद्र तलाठी यांच्या शुभहस्ते सोमवारी करण्यात आला.

१ मार्च २०२१ रोजी पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलिस विभाग प्रमुख डॉ.भूषणकुमार उपाध्याय अप्पर पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार हायवे “हायवे मृत्युंजय दूत योजना” राज्यात राबविण्यात आली.याच अनुषंगाने मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी पोलीस मदत केंद्र येथे मृत्युंजय दूत म्हणून चार पथके सज्ज करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.हायवे मृत्युंजय देवदूत टीम भरणे नाका, हायवे मृत्युंजय देवदूत टीम कशेडी बंगला,हायवे मृत्युंजय देवदूत टीम पोलादपूर,हायवे मृत्युंजय देवदूत टीम पोलादपूर ट्रॉकर्स अशा चार टीम आहेत.

यावेळी डॉ. उपेंद्र तलाठी , पोलीस ठाण्याचे पीएसआय चांदने,कशेडी टेप चे सहाय्यक यशवंत बोरकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल सुर्वे आणि पोलीस कर्मचारी,पत्रकार धनराज गोपाळ (रायगड टाईम्स पोलादपूर), पत्रकार राजेंद्र चव्हाण(तरुण भारत-खेड), मदत ग्रुप खेड अध्यक्ष-प्रसाद गांधी उपस्थित होते.

यावेळी अपघातग्रस्थांना तात्काळ मदत कशी करावी याबाबत माहिती आणि मार्गदर्शन डॉ.तलाठी यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. दरम्यान मृत्युंजय देवदूत टीम भरणे नाका येथे प्रसाद गांधी, शिवाजी यादव,रोहन ऐरणकर, रोहित ऐरणकर,सुदर्शन कदम, हृतिक कदम यांची नियुक्ती करण्यात आली.कशेडी बंगला येथे मुकुंद मोरे, सहदेव कदम, महेश रांगडे,प्रकाश मादगे,समीर मोरे यांचे पथक तैनात असणार आहे. ⭕

Previous article🛑 मराठी भाषा दिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राज साम्राज्य प्रतिष्ठान 🛑
Next articleत्या नराधम शिक्षकास कुंटुर पोलिसांनी केले तत्काळ जेरबंद – दोन दिवसांची पोलीस कोठडी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here