वडापावचे पैसे बुडवणं पडलं महागात…गजा मारणे टोळीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा 🛑

0
45

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210303-WA0137.jpg

🛑 वडापावचे पैसे बुडवणं पडलं महागात…गजा मारणे टोळीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा 🛑
✍️ पिंपरी 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पिंपरी :⭕पुण्यातील सराईत गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ऊर्से टोलनाक्यावर टोलबरोबर वडापाव आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचेही पैसे दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दरोड्याचाही गुन्हा आज दाखल करण्यात आला. यामुळे गजा टोळीविरुद्धचा फास पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी कडक आवळला आहे.

आता हा अजामीनपात्र असा दरोड्याचा गंभीर गुन्हा आणि अगोदर दहशत पसरवल्याबद्दलचे दाखल झालेले पाच गुन्हे असे एकूण सहा गुन्हे  दाखल झाल्याने गजा मारणे टोळीला मोका लावण्याची तयारी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सुरु केली आहे. त्यांनी स्वतः आज याला दुजोरा दिला. तसे झाले, तर गजाला पुन्हा काही महिने तुरुंगात काढावे लागणार आहेत.

न्यायालयाने दोन खून खटल्यातून निर्दोष मुक्तता करताच गजाची १५ फेब्रुवारीला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी त्याची तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढली होती. त्याबद्दल दहशत माजवल्याबद्दल पहिला गुन्हा पिंपरी चिंचवड पोलिसांनी गजा व साथीदारांविरुद्ध नोंद केला. त्यानंतर पुणे व खोपोलीतही ते दाखल करण्यात आले. पण, हे सर्व गुन्हे जामीनपात्र असल्याने एका गुन्ह्यात गजाने लगेचच जामीनही घेतला होता.

दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यावरील गुन्ह्याचा तपास करताना गजा व साथीदारांनी एक्स्प्रेस वे वरील ऊर्से टोलनाक्यावर टोलच भरला नसल्याचे आढळले. तसेच, तेथील फूडमॉलवर त्यांनी घेतलेला वडापाव आणि पाण्याच्या बाटल्यांचेही पैसे त्यांनी दिले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा आता तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात आज दाखल करण्यात आला.

त्यामुळे गजा सापडला,तर आता तो लगेच जामिनावर सुटणार नाही. त्यात जर मोका लागला,तर पुन्हा काही महिने त्याला तुरुंगात घालवावे लागणार आहेत. ⭕

Previous articleशिक्षकांनी शाळाबाह्य सर्वेक्षण करावे : रवींद्र ठोकळ
Next articleलाडक्या चिरंजीवाच्या लग्नासाठी सोन्याची पत्रिका 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here