🛑 खेड तालुक्यातील गुणदे प्रीमिअर लीग मध्ये शिवकृपा फायटर्स विजेता तर उपविजेता श्रीराम फायटर्स 🛑

0
69

🛑 खेड तालुक्यातील गुणदे प्रीमिअर लीग मध्ये शिवकृपा फायटर्स विजेता तर उपविजेता श्रीराम फायटर्स 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:⭕ तालुक्यातील गुणदे गावातील १२ वाड्यामधील तरुण वर्ग एकत्र यावे आणि गावात एकता निर्माण व्हावी या उद्देशाने गुणदे प्रीमिअर लीग ४चे आयोजन केले होते.

ही स्पर्धा २७ ते २८ फेब्रुवारी संपन्न झाली.या स्पर्धेत १० संघ होते आणि ते १० संघ संघमालकांनी विकत घेतले होते.शिवकृपा फायटर्स, श्रीराम फायटर्स , सद्गुरु फायटर्स, केदारनाथ फायटर्स ,डायमंड मित्र मंडळ ऋषीकेश फायटर्स, विघ्नेश्वर फायटर्स ,माऊली वॉरिअर्स तिरुपती बालाजी,पुणे वॉरियर्स असे दहा संघ होते.या स्पर्धेत श्री.कृष्णकांत जंगम गुरुजी जल फाउंडेशन सल्लागार यांचा शिवकृपा फायटर्स संघ विजेता संघ ठरला तर सुभाष आंब्रे यांचा श्रीराम फायटर्स संघ उपविजेता संघ ठरला.

या स्पर्धेत राकेश उर्फ पिंकी आंब्रे – बेस्ट बॅट्समन,कु मिलिंद आंब्रे बेस्टबॉलर, कु निखिल बांद्रे बेस्ट- फिल्डर ठरले.प्रत्येक संघाच्या कर्णधाराला मेडल्स, संघ मालकांना सन्मान चिन्ह तर विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला गोल्ड मेडल तर उपविजेत्यांना सिल्व्हर मेडल प्रदान केले.या स्पर्धेचे उद्घाटन गुणदे गावचे सरपंच श्री रविंद्र आंब्रे यांच्या हस्ते झाले.मा .श्री सुनिल शेठ मोरे साहेब सभापती शिक्षणव अर्थ समिती रत्नागिरी जि प यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण झाले.

प्रमुख उपस्थिती
मा.श्री विष्णूपंत आंब्रे शिव सेना उपतालुका प्रमुख,मा सरपंच श्री रविंद्र आंब्रे, उपसरपंच सौ संध्या कांदेकर,पो पाटील-श्री रामचंद्र पवार,ग्रा.प सदस्य श्री सुभाष आंब्रे ,श्री चंद्रकांत आंब्रे,श्री रत्नाकर कारेते, या स्पर्धेचे आयोजन श्री सुधाकर आंब्रे, समीर आंब्रे,विवेक आंब्रे, कामराज पाचाडकर,श्री सागर आंब्रे,श्री जगदिश उर्फ बाबू आंब्रे, जितेंद्र धाडवे, अजित आंब्रे आणि सहकारी मित्रांनी उत्तम नियोजन करून आयोजन करून स्पर्धा यशस्वी पार पाडल्या. यावेळी बोलतांना मा मोरे साहेब यांनी विजेत्या उपविजेत्या संघांसह सर्व १० ही संघांचे कौतुक केले.

स्पर्धांचे धावते समालोचन श्री सुरज कदम भेलसई यांनी अत्यंत उत्तम रितीने पार पाडले
शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here