ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, दौलत देसाई

0
43

ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, दौलत देसाई

कोल्हापूर : कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा दिनांक 1 मार्च पासून सुरू करण्यात आला असून या अंतर्गत 60 वर्षावरील व्यक्ती व शासनाने निर्दिष्ठीत केलेल्या 20 आजारांमधील एखादा आजार असणाऱ्या 45 वर्षावरील व्यक्तींना कोविड-19 लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 120 केंद्रावर लसीकरण सुरू आहे. यामध्ये ऑनलाईन व ऑन साईट रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्येष्ठ व व्याधीग्रस्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव,आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे उपस्थित होते.
या मोहिमेसाठी कोविन ॲप अपडेट करण्यात आले असून COWIN 2.0 हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. या अंतर्गत नागरिकांना (60 वर्षे पूर्ण व 45 वर्षे पूर्ण व व्याधीग्रस्त), राहिलेले आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध केलेले आहेत. ऑन साईट रजिस्ट्रेशन यामध्ये लसीकरण सत्र सुरू असताना आवश्यक ओळखपत्रासह नोंदणी करून व्हेरिफिकेशन झाल्यावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन यामध्ये उपलब्ध लिंकव्दारे लाभार्थी स्वत:च्या लसीकरणासाठी नोंदणी करून लसीकरण केंद्र व वेळ याची अपॉईंटमेंट घेवू शकतात (लिंक https://selfregistration.cowin.gov.in/). या दोन पर्यायाचा उपयोग करून पात्र नागरिकांना कोविड-19 लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये 120 केंद्रांवर लसीकरण सुरू असून लवकरच सर्व उपजिल्हा रूग्णालय/ग्रामीण रूग्णालय/प्राथमिक आरोग्य केंद्र व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रूग्णालयात लसीकरण सुरू केले जात आहे. यामध्ये खासगी लसीकरण केंद्रांमध्ये सशुल्क लस मिळेल (250 रूपये प्रति डोस). लसीकरणासाठी 60 वर्षावरील नागरिकांना कोणतेही फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी) तर 45 वर्षावरील व व्याधीग्रस्त नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी ओळखपत्र व 20 व्याधीपैकी किमान एक व्याधी असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे 75, उपजिल्हा /ग्रामीण रूगणालये 21, महानगरपालिका – 8 व खासगी रूग्णालये 16 अशी एकूण 120 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लसीकरण केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र – प्राथमिक आरोग्य केंद्र आजरा, प्राथमिक आरोग्य केंद्र भुदरगड, प्राथमिक आरोग्य केंद्र चंदगड, प्राथमिक आरोग्य केंद्र गडहिंग्लज, प्राथमिक आरोग्य केंद्र गगनबावडा, प्राथमिक आरोग्य केंद्र हातकणंगले, प्राथमिक आरोग्य केंद्र करवीर, प्राथमिक आरोग्य केंद्र पन्हाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र राधानगरी, प्राथमिक आरोग्य केंद्र शाहूवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र कागल व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोळ. उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय- ग्रामीण रूग्णालय आजरा, ग्रामीण रूग्णालय गारगोटी, ग्रामीण रूग्णालय चंदगड, उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज, ग्रामीण रूग्णालय नेसरी, ग्रामीण रूग्णालय गगनबावडा, आयजीएम इचलकरंजी, ग्रामीण रूग्णालय पारगाव, ग्रामीण रूग्णालय हातकणंगले, ग्रामीण रूग्णालय कागल, ग्रामीण रूग्णालय मुरगूड, उपजिल्हा रूग्णालय गांधीनगर, सेवा रूग्णालय बावडा, ग्रामीण रूग्णालय खुपीरे, ग्रामीण रूग्णालय पन्हाळा, उपजिल्हा रूग्णालय कोडोली, ग्रामीण रूग्णालय राधानगरी, ग्रामीण रूग्णालय सोळांकुर, ग्रामीण रूग्णालय मलकापूर, ग्रामीण रूग्णालय शिरोळ व ग्रामीण रूग्णालय दत्तवाड.
महानगरपालिका क्षेत्र – युपीएचसी सिध्दार्थ नगर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, युपीएचसी राजारामपुरी, पंचगंगा रूग्णालय, युपीएचसी महाडिकमाळ, युपीएचसी फिरंगाई, सीपीआर हॉस्पिटल, युपीएचसी सदर बाजार. खासगी लसीकरण केंद्रे- देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज, संत गजानन महाराज हॉस्पिटल गडहिंग्लज, कुडाळकर हॉस्पिटल पेठ वडगाव, ह्दया हॉस्पिटल हेर्ले,अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी, सिध्दगिरी हॉस्पिटल कणेरी, अथायू हॉस्पिटल उजळाईवाडी, यशवंत धर्मादाय हॉस्पिटल कोडोली, संजीवनी हॉस्पिटल बोरपाडळे, शतायू हॉस्पिटल, केपीसी हॉस्पिटल, ॲपल हॉस्पिटल, डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, सिध्दीविनायक नर्सिंग होम.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleझेप प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याबद्दल माय मराठी फाउंडेशनतर्फे सन्मान..
Next article🛑 खेड तालुक्यातील गुणदे प्रीमिअर लीग मध्ये शिवकृपा फायटर्स विजेता तर उपविजेता श्रीराम फायटर्स 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here