🛑 कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा कल्याण या संस्थेच्या वतीने कुणबी समाज विकास संघ, मुलुंड विभाग मुंबई या संस्थेला आदर्श सामाजिक संस्था म्हणून पुरस्कार प्रदान 🛑

0
75

🛑 कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा कल्याण या संस्थेच्या वतीने कुणबी समाज विकास संघ, मुलुंड विभाग मुंबई या संस्थेला आदर्श सामाजिक संस्था म्हणून पुरस्कार प्रदान 🛑
✍️ कल्याण 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

कल्याण:-⭕शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी टिटवाळा तालुका कल्याण येथील एक प्रतिष्ठित सामाजिक संस्था राजे श्री शिवछत्रपती कोंकण प्रतिष्ठान या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन, शिवजयंती उत्सवानिमित्त महारक्तदान शिबीर आयोजित करून दिवसभर अनेक कार्यक्रम व उपक्रम, शिव व्याख्यान, महिलांचे रंगबेरंगी खेळ व हळदीकुंकू तसेच विविध पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी टिटवाळा कल्याण, मुंबई येथून अनेक विविध स्तरावरून मान्यवर मंडळी यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार हे कुणबी समाज विकास संघ, मुलुंड विभाग मुंबई या संस्थेचा गेली अनेक वर्षे चालू असलेले सामाजिक, लोकपयोगी कार्यक्रम-उपक्रम तसेच सामान्य तळागाळातील सामाजिक घटक यांच्यापर्यंत असलेले एक सामाजिक बांधिलकी व कर्तव्य लक्षात घेऊन, तसेच कोरोनाच्या महामारीत सुद्धा या सामाजिक संस्थेने प्रत्येक समाजघटक यांना मदती सारखे अन्य मोलाचे योगदान दिले आहे.

अगदी प्रसिद्धी पासून दूर राहून नेहमीच प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करताना आज मुंबई सारख्या शहरात एक मजबूत संघटना म्हणून उभी आहे. तसेच त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात सर्वच हॉस्पिटल, रक्तपेढी येथे रक्ताचा अपुरा साठा असल्याने त्यांनी याच पार्श्वभूमीवर एका वर्षात ४ वेळा रक्तदान शिबीर कार्यक्रम घेऊन एक सर्वच संस्थेसमोर आदर्श निर्माण केला आहे.

याचाच एक भाग म्हणून त्यांना आदर्श सामाजिक संस्था म्हणून एक मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन राजे श्री शिवछत्रपती कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा तालुका कल्याण या संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला. तसेच कोंकणरत्न साने गुरुजी पुरस्कार श्री प्रसादजी फर्डे सर व अनेकांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.

कुणबी समाज विकास संघ मुलुंड विभाग, मुंबई या सामाजिक संस्थेला आदर्श पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वच स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव चालू आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here