🛑 सामाजिक कार्यकर्ता अजय भोसले ह्याचे समता विचार प्रसारक संस्था व ठाणेकराच्या वतीने कॊरोना वीर म्हणून सन्मान 🛑

0
78

🛑 सामाजिक कार्यकर्ता अजय भोसले ह्याचे समता विचार प्रसारक संस्था व ठाणेकराच्या वतीने कॊरोना वीर म्हणून सन्मान 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे:-⭕समता विचार प्रसारक संस्था (संलग्न: जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय – NAPM) आयोजित सामाजिक संवेदनशीलतेची ज्योत तेवत ठेवणार्‍या वीरांचे जाहीर कौतुक करण्यात आले. तसेच  किसान ज्योत यात्रेत ठाणे ते दिल्ली सहभागी साथी अजय भोसले याचा कॊरोना वीर सन्मान व अनुभव कथन ! करण्यात आले. ठाणे दिल्ली किसान ज्योत यात्रेची पाश्व भूमी व दिल्लीत झालेले दंगल खरी की खोटी व तेथील आढावा ह्यावर अनुभव कथन करण्यात आले. तसेच देशात अचानक लादलेल्या लॉकडाउन काळात कोरोनाला न घाबरता वस्ती वस्तीत जाऊन काम केलेल्या एकूण ५० हुन अधिक  बहाद्दर व संवेदनशील ठाणेकर वीरांचा सन्मान ! ह्या वेळी करण्यात आला.

कॊरोना काळात मदत कार्यात सहभागी, समता विचार प्रसारक संस्थेच्या मदतीला संस्थांचा सन्मान !! करण्यात आले १) तेजस्विता प्रतिष्ठान २) आपले ठाणे आपले फाऊंडेशन ३) जाग,ठाणे ४) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती , ठाणे शाखा ५) म्युज फाऊंडेशन ६) झेप प्रतिष्ठान ७) वी टुगेदर फाउंडेशन ८) Each One Feed one ह्या संस्थेच्या सन्मान ह्यावेळी करण्यात आला. हा कार्यक्रम दिनांक शनिवार, दि. १३ फेब्रुवारी २०२१ सायं. ५ ते ७, मराठी ग्रंथ संग्रहालय, स्टेशन रोड, जिल्हा परिषद कार्यालया समोर, ठाणे (प).येथे पार पडला

प्रमुख पाहुणे : पत्रकार, संपादक मा. अभय कांता व सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता श्रीवास्तव व कार्यक्रमाचे अध्यक्ष : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया व सूत्रसंचालन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ  हे होते व आपले संस्थेच्या कार्यहवाल एकलव्य विद्यार्थी व कार्यकर्ता सुशांत जगताप ह्यांनी मांडला व आभार संस्थेच्या सहसचिव अनुजा लोहार हिने केले व कार्यक्रम राष्ट्रगीतांनी समारोप करण्यात आले…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here