.शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा, प्रा.डॅा.माने

0
64

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210221-WA0011.jpg

छ.शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा, प्रा.डॅा.माने

पेठ वडगाव: छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील रयतेच्या कल्याणासाठी आदर्श प्रशासन व्यवस्था निर्माण केली. त्यांनी कृषी, व्यापार व लोककल्याणासाठी वापरलेल्या धोरणांची उपयुक्तता आजच्या काळातही दिसून येते. तेंव्हा महाराजांचा आदर्श समोर ठेऊन राज्यकर्त्यांनी आपली धोरणे ठरवावीत असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. संभाजीराव माने यांनी केले. ते श्री विजयसिंह यादव महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागामार्फत शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सचिन पवार होते.
डॉ. माने पुढे म्हणाले कि शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया हा जनकल्याण व भेदभाव विरहित समाज या मूल्यावर घातला. महाराज हे निडर योद्धा व कुशल प्रशासक होते. तरुणांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून जीवनध्येय प्राप्त करावे.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अधिकराव निकम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शोर्य, नाविन्यता, रयतेविषयीचा जिव्हाळा, धर्मनिरपेक्षता , लोकसंग्रह इ. गुणांची माहिती देवून महाराज हे जाणता राजा केसे होते हे सदोहरण सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. सचिन पवार यांनी छ. शिवाजी महाराजांची व्यवस्थापन कौशल्य जगाने स्वीकारली असल्याचे सांगून आजच्या तरुण पिढीने जगाच्या स्पर्धेत सक्षमपणे यशस्वी होण्यासाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून छ. शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. सी. सी. विभाग प्रमुख डॉ. प्रशांत यादव यांनी केले तर आभार प्रा. अतिष खांडेकर यांनी मानले. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्राचार्य डॉ. विजया चव्हाण यांचे मार्गदर्शन तर डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. अमर पोवार, श्रीनिवास रोंगटे, अमर होगाडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास एन. सी. सी. विभागातील छात्र उपस्थित होते.
श्री. विजयसिंह यादव महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागामार्फत शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. संभाजीराव माने सोबत डॉ. सचिन पवार, डॉ. बाळासाहेब जाधव, प्रा. अधिकराव निकम, डॉ. प्रशांत यादव व प्रा. अतिष खांडेकर इत्यादी उपस्थित होते.

Previous articleचारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून 
Next articleजिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ तर तिघांचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here