लॉकडाऊनबाबतचे व्हायरल संदेश पूर्णतः चुकीचे अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

0
65

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210220-WA0107.jpg

लॉकडाऊनबाबतचे व्हायरल संदेश पूर्णतः चुकीचे
अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड,दि. २० – राजेश एन भांगे

कोरोना बाधितांची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती खबरदारी घेत आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत: अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. नागरिकांनी जर संयमी जबाबदारी पार पाडली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तथापि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे असून ज्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर अथवा ट्विटर, इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleमौजे जांब (बु.) येथे तब्बल 4 लाख 76 हजार 500 रुपयाचा गुटखा जप्त नव्या पोलीस निरीक्षकाची गुटखा विक्रेत्याच्या विरोधात धाडसी कारवाई.
Next articleजिल्ह्यात आजअखेर 48 हजार 286 जणांना डिस्चार्ज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here