तुंबाड मध्ये पुन्हा श्री.बेंडु भागोजी कदम यांची प्रभारी सरपंच व उपसरपंच पदी बिनविरोध निवड 🛑

0
75

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210218-WA0056.jpg

🛑 तुंबाड मध्ये पुन्हा श्री.बेंडु भागोजी कदम यांची प्रभारी सरपंच व उपसरपंच पदी बिनविरोध निवड 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:-⭕नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खेड तालुक्यातील तुंबाड ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ५३ वर्षे बिनविरोध परंपरा राखत मागील पाच वर्षांच्या कामाची पोच पावती देत ग्रामस्थांनी श्री.बेंडु कदम यांना पुन्हा एकदा प्रभारी सरपंच व विद्यमान उपसरपंच म्हणून निवडून गावच्या सर्वांगीण विकासासाठी निवड करण्यात आली. यापुर्वीच ग्रामस्थांनी सहा सदस्य बिनविरोध निवडुन दिले होते.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडली

तसेच नवनिर्वाचित सदस्य म्हणून श्री.रविंद्र विठ्ठल निकम, श्री.विजय रामचंद्र जाधव, सौ.प्रमिला भरत रेमजे, सौ.सरिता योगेश बिर्जे व सौ.सविता सहदेव कदम यांची निवड झाली आहे. नवनिर्माण सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे गुहागर चे आमदार श्री. भास्कर शेठ जाधव व दापोली-खेड चे आमदार श्री.योगेश दादा कदम तसेच तुंबाड गावचे पो.पाटील श्री.हरिश्चंद्र कदम, तुंबाड हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री.खेडेकर सर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.रामचंद्र घडशी, माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री परशुराम जावळे तसेच गावाच्या विकासकामांतुन अमुलाग्र बदल होईल व्यक्त करत युवा वर्ग व महिला मंडळ आणि सर्वच क्षेत्रातून अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे किल्ले जयगड स्वच्छता मोहीम 🛑
Next articleप्रहार जनशक्ती पक्षाच्या एकलारा सर्कल उपाध्यक्ष पदी नागेश गुगे वाड यांची निवड..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here