मुखेड तालुक्यातील हसनाळ (प.दे) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मारोती नाईक तर उपसरपंच पदी नागनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड.

0
43

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210214-WA0081.jpg

मुखेड तालुक्यातील हसनाळ (प.दे) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मारोती नाईक तर उपसरपंच पदी नागनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे हसनाळ प.दे
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मारोती पंडितराव नाईक तर उपसरपंच नागनाथ कांबळे यांची १२ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
हसनाळ ग्राम पंचायत यापूर्वीच गावकऱ्यांनी बिनविरोध काढली होती बिनविरोध निवडीच्या वेळी मा.सरपंच एकनाथराव नाईक,गुलाबराव नाईक,यशवंत खरात,बालाजी नरबागे,महाजन नाईक,बालाजी धमने,नारायण खरात,पंडित कांबळे,दत्ता नाईक,विकास नाईक,कोंडीबा कोकरे,राजू पाटील,राजाराम कांबळे,बळवंत नाईक,उत्तम नाईक यांची उपस्थिती होती.बिनविरोध निवड झालेल्या ग्रा.प.सदस्यामध्ये विनोद नाईक,गुलछनबाई वाडीकर,सुशीला नाईक,शोभा गदले,देविका नाईक यांच्या समावेश आहे.यावेळी पुढे बोलताना नवनिर्वाचित सरपंच मारोती म्हणाले की
हसनाळ (प.दे) च्या जनतेने माझ्या वर टाकलेली जबाबदारी मी विकासाच्या कामातून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीन निवडी नंतर गावात कोणतेच गट तट राहणार नाहीत या बाबतही मी सर्वाना विश्वासात घेण्याचा प्रयत्न या पुढील काळात करणार असल्याचे आश्वासन सरपंच मारोती नाईक यांनी दिले.यावेळी हसनाळ प.दे. गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here