चिंचवे (गा) परिसरातील डोंगर आणि जंगलाला भयानक आग

0
109

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210214-WA0009.jpg

चिंचवे (गा) परिसरातील डोंगर
आणि जंगलाला भयानक आग
मालेगांव/युवा मराठा न्युज नेटवर्क
मालेगांव तालुक्यातील काटवन परिसरातील चिंचवे गा व नागझिरी या दोन्ही गावाच्या शिवारात जंगल,कुरण,व डोंगराला काल शनिवारी दि.१३ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा आग लागल्याने खळबळ उडाली आहे.
वेगवेगळ्या तीन ठिकाणी आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच मोठीच धावपळ उडाली.मालेगांव महापालिका अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.या आगीत वनस्पती ,झाडे,गवत जळून नष्ट झाल्याची माहिती मिळत आहे.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.अग्निशमन अधिक्षक संजय पवार स्वतः घटनास्थळी रवाना झाले होते.वडनेर खाकुर्डी पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.रात्री उशिरापर्यत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु होते.”युवा मराठा”चे वाचक व चिंचवे (गा) येथील पोलिस पाटील तुषार खैरनार यांनी हि माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here