सोशल मिडीयामुळे जीवनाचे सार्थक झाले, मोहन शिंदेचे कार्य समाजात वाढले

0
71

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210212-WA0097.jpg

सोशल मिडीयामुळे जीवनाचे सार्थक झाले,
मोहन शिंदेचे कार्य समाजात वाढले…! लेखन-सौ.निर्मला(निशा) शिंदे व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा कोल्हापूर हातकणगंले आवृती
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव येथील श्री.मोहन परशूराम शिंदे एसटी महामंडळाचे चालक किरकोळ अपघातामुळे व डाँक्टरच्या हलगर्जीपणामुळे गेली अडीच वर्षे घरीच बसुन आहेत.
पण घरी बसुन चैन पडत नव्हता कायम मोबाईलमधे लक्ष घालायचे मी सौ.निशा मोहन शिंदे (पत्नी) नेहमी ओरडायची मोबाईल प्रमाणापेक्षा जास्त पाहु नका डोळे खराब होतील , पण कधी ऐकत नव्हते .
पण त्यांना एके दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी २०२० रोजी मोबाईला च्या माध्यमातून नाशिक मालेगावचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्याशी ओळख झाली त्याच दिवशी त्यांची युवा मराठा न्युज च्या कोल्हापूर ब्युरोचिफ पदी निवड झाली तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा दिवस होता त्यांना खुप आनंद झाला होता. छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने त्यांची कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती.
युवा मराठा न्युजचे व्हिडीओ न्युज, वेब साईट आणि पोर्टलचे काम करत करत त्यातुन मिळकत काय होईना म्हणून मी नेहमी ओरडायची मोबाईल सारखा पाहु नका. त्यातुन काय फायदा होणार नाही. एके दिवशी देवासारखे धाऊन आले ते म्हणजे मुख्य संपादक श्री. राजेंद्र पाटील राऊत जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारधारेवर चालणाऱ्या राजेंद्र पाटील राऊत यांनी “जे जे आपणांशी ठावे,ते इतरांशी सांगावे शहाणे करुन सोडावे सकळ जन” या अभंगातील ओळीप्रमाणे साप्ताहिक युवा मराठा वृतपत्र हातकणंगले तालुका आवृत्ती चालू करण्याची परवानगी दिली तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करुन युवा मराठा पश्चिम महाराष्ट्रात वाढविण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले.त्याचप्रमाणे युवा मराठा वृतपत्र व आँनलाईन न्युज चँनलच्या महाराष्ट्राच्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांनीही वेळोवेळी धाडस व धैर्य दाखवत जिद्द,हिंमत,आणि आत्मविश्वास या त्रिसुत्रीवर कार्य करण्यास प्रेरीत केल्यामुळे आज युवा मराठा वृतपत्रांच्या माध्यमातून थोडीफार मिळकत होऊ लागली. कोण म्हणत, या जगात माणूसकी व मानवता नाही,ते तर मला राजेंद्र पाटील राऊत व श्रीमती आशाताई बच्छाव मँडम यांच्या रुपातून बघावयास मिळाले.सामाजिक कार्य करत करत इतरांची अडीअडचणी सोडवू लागले त्याच बरोबर संपादक म्हणून मान सन्मान मिळु लागला .
पोलिस स्टेशन , हाँस्पिटल , शासकिय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखी झाल्या.
हाँस्पिटल च्या माध्यमातून डाँ.सुरज कुडाळकर यांच्या हाँस्पिटलमध्ये मित्र व नातेवाईक यांची मोठ मोठी मोफत आँपरेशन योजनेच्या माध्यमातून मदत केली .
नेहमी दुसऱ्याच्या मदतीला रात्री अपरात्री धाऊन जात असे,
कुणी काही काम सांगितले कि लगेच जाऊन त्याला मदत करणार .
आजपर्यंत केलेल्या मदतीचा आज त्यांना खुप मोठा आशिर्वाद मिळाला कुणाच्या स्वप्नातही नव्हते त्यांना कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी निवड होईल असे .
भारतीय मराठा महासंघ जिल्हाअध्यक्ष पद मिळाल्या पासुन सोशल मिडीया , फेसबुक व प्रत्यक्ष मित्रपरिवार ,नातेवाईक यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला, काहींनी घरी येऊन सत्कार केला.
आज पेठ वडगांव मधील श्री जयभवानी पत संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभेत शाल, श्रीफळ , प्रमाणपत्र , पूष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला .
आज त्यांना इतका आंनद झाला होता कि त्यांचे मन भारावुन गेले होते.
आज त्यांनी मला बोलून दाखवले कि मी जर त्यावेळी मोबाईलमधे लक्ष घातले नसते तर आजचा गौरव मान सन्मान मला मिळाला नसता.
मोबाईल जितका वाईट आहे तितकाच चांगलाही आहे.
एखाद्याचे आयुष्यच बदलुन जाते. कधी काय नशिबात काय घडेल काही सांगता येत नाही.
एक वर्षात जे काही घडत गेलं ते अतिशय चांगलेच होत गेलं .आज युवा मराठा न्युजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात मोहन शिंदे हे नाव पोहचले हि सगळी किमया आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद व मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांचे सततचे प्रोत्साहन व मार्गदर्शन यामुळेच हि खडतर वाटचाल सुरळीत व सोपी झाली!

Previous articleपालघर जिल्ह्यात चारोटी येथे भिषण अपघात
Next articleऔसा_ औसा तालुक्यातील बेलकुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विष्णू निवृत्ती कोळी तर उपसरपंचपदी सचिन भीमराव पवार हे विजयी झाले आहेत.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here