मराठा आरक्षणाची सुनावणी ८ मार्च पासून १० दिवसांचं सर्वोच्च न्यायालय 🛑

0
44

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210205-WA0059.jpg

🛑 मराठा आरक्षणाची सुनावणी ८ मार्च पासून १० दिवसांचं सर्वोच्च न्यायालय 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नवी दिल्ली :⭕सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या मराठा आरक्षणाचं प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे. कोरोना संकटकाळात ही सुनावणी ऑनलाईन सुरू होती पण आता प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी अशी आग्रही भूमिका सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र आज त्यावर माहिती देताना सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मार्च महिन्यातील परिस्थिती पाहून ऑनलाईन घ्यावं की प्रत्यक्ष याची माहिती देणार आहे. आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये कोर्टाने दोन्ही बाजूच्या सरकारला वेळ देत पुढील सुनावणी 8 मार्च पासून सुरू होणार असल्याचं सांगत एक वेळापत्रक जारी केले आहे. यामध्ये आता केंद्र सरकारला देखील पक्षकार करण्यात आले आहे.

त्यामुळे आता 8-18 मार्च दरम्यान चालणार्‍या सुनावणी मध्ये मराठा आरक्षणाचं अभितव्य अवलंबून असणार आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान पुढील सुनावणीचं वेळापत्रक जारी करताना 8,9,10 मार्च 2021 हे दिवस याचिका कर्त्यांची बाजू ऐकण्यासाठी, 12,15, 16 मार्च 2021 हे दिवस राज्य सरकारची बाजू ऐकण्यासाठी, 17 मार्च हा दिवस मध्यस्थांची बाजू ऐकण्यासाठी तर 18 मार्च हा दिवस केंद्र सरकारची राखीव ठेवण्यात आला आहे. आता मराठा आरक्षण प्रकरणामध्ये केंद्र सरकारला देखील पार्टी करण्यात आल्याने अ‍ॅटर्नी जनरल यामध्ये केंद्र सरकारची बाजू मांडतील पण ते दोघांचीही बाजू मांडतील असं सांगण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 दिवशी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे वर्षभरासाठी राज्यात मराठा आरक्षणाअंतर्गत शिक्षण आणि नोकरी मधील आरक्षण बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका यंदा अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. अनेक परीक्षा, नोकर भरतीला देखील उशिर झाला आहे. आज कोर्टात मराठा आरक्षण हे किचकट प्रकरण आहे.

त्याची ऑनलाईन सुनावणी, वकिलांमधील समन्वय ही प्रक्रिया राबवणं कठीण होत असल्याचं राज्य सरकराचे वकील मुकूल रोहतगी यांनी म्हटलं आहे. त्यांनी प्रकरण पाहता प्रत्यक्ष सुनावणीची मागणी केली आहे. तर कपिल सिब्बल यांनी आता हे प्रकरण 11 जणांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे…⭕

Previous articleपेट्रोल – डिझेल दरवाढ मागे घ्या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
Next article🛑 खेड तालुका रहिवासी मंच दिवा यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here