पुण्यातील खून प्रकरणी कुख्यात गुंड मारणे याच्यासह 22 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता 🛑

0
101

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210204-WA0003.jpg

🛑 पुण्यातील खून प्रकरणी कुख्यात गुंड मारणे याच्यासह 22 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे –⭕घायवळ आणि मारणे टोळीत वैमनस्य आहे. घायवळ टोळीच्या सचिन कुडले याचा खून झाला होता. त्यामध्ये फिर्यादी व मयत दोघेही आरोपी होते. ते दोघे जामिनावर असताना वर्चस्व आणि सचिन कुडले याच्या खूनाचा बदल घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

पुण्यातील टोळी युद्धात गाजलेल्या अमोल बधे खून प्रकरणात मोक्कानुसार कारवाई केलेल्या कूविख्यात गजानन पंढरीनाथ मारणे व त्याच्या 20 साथीदारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. सुधीर शहा, ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. विपुल दुशिंग, ऍड. सिध्दार्थ पाटील, ऍड. जितंद्र सावंत आणि ऍड राहुल भरेकर यांनी काम पाहिले. तर फिर्यादी संतोष कांबळे हा गुन्ह्यात जखमी झाला होता. मयत अमोल आणि संतोष हे घायवळ टोळीचे आहेत.
सव्वा सहा वर्षांपूर्वी टोळीच्या वर्चस्वातून नीलेश घायवळ टोळीतील अमोल बधे याचा नवी पेठेत गोळ्या घालून खून केल्याप्रकरणात कुख्यात गजानन मारणे (वय 49, रा. कोथरूड) याच्यासह 22 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली. विशेष मोक्का न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी हा आदेश दिला.

29 नोव्हेंबर 2014 रोजी दुपारी 4.15 च्या सुमारास ही घटना घडली होती.

. विशेष मोक्का न्यायाधीश श्री ए वाय थत्ते यांनी सदरील न्यायनिवाडा केला असून पुराव्याच्या अभावी सदरील आरोपींची मुक्तता केली असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. प्रस्तुत प्रकरणात आरोपीतर्फे ऍड सुधीर शहा, ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड विपुल धुशिंग व ऍड सिद्धार्थ पाटील यांनी कामकाज पाहिले आहे. गजानन मारणे (वय 49), रुपेश कृष्णराव मारणे (वय 31), मंदार उर्फ विकी सुरेश बांदल (वय 26), बालाजी कमलाकर कदम (वय 22), सागर श्रीरंग डिंबळे (वय 24), विक्रम विलास समुड्रे (वय 24), विशाल उर्फ गोट्या श्रीरंग डिंबळे (वय 25), राहुल उर्फ बंटी रामकृष्ण कळवणकर (वय 21), तुषार बधे (वय 32), आकाश अवचर (वय 21), अक्षय वेडे (वय 21), प्रतीक जाधव (वय 23), अक्षय जोरी (वय 21), स्वप्नील मापारे (वय 23), ओंकार जाधव (वय 21), विशाल धुमाळ (वय 28), योगेश मोहिते (वय 27) बाळकृष्ण उर्फ पंड्या मोहिते (वय 30) सोमप्रशांत पाटील (वय 42), सागर राजपुत, राकेश गायकवाड उर्फ बाब्या गुरुजी, तानाजी कदम, निखिल दुगाई, पप्पू उर्फ अतुल कुडले, सचिन ताकवले अशी निर्दोष मुक्तता केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष कांबळे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली होती.

*महत्वाचे – अमोल बधेचा दि. 29 नोव्हेंबर 2014 रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नवी पेठेतील स्मशानभुमी रोडवरील कलावती मंदिराजवळ टोळी युध्दातून खून झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी 3 गावठी पिस्तुले, 2 काडतुसे आणि 11 लोखंडी कोयते जप्त केली होती. 10 मोबाइल हॅन्डसेट आणि वाहने असा एकुण तब्बल 5 लाख 32 हजार रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केला होता* ⭕

Previous articleप्रविण तरडे यांचा सोशल मीडियावर पालकांना मोलाचा सल्ला 🛑
Next articleकोकण खेड युवाशक्ती पिंपरी-चिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव सोहळा आणि हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here