देशात पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना, बजेटमध्ये ३,७६८ कोटी रुपयांची तरतूद ; केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन

0
71

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210202-WA0112.jpg

देशात पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना, बजेटमध्ये ३,७६८ कोटी रुपयांची तरतूद ; केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन

विशेष प्रतनिधी – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

दिल्ली, दि.२ – देशाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपातील जनगणणना होणार आहे.
यासाठी अर्थसंकल्पामध्ये ३,७६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच जाहीर केलं होतं की, २०२१ ची जनगणना ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून केली जाणार आहे.
डिजिटल इंडियाला प्रमोट करण्साठी पारंपारिक पेन आणि पेपरची पद्धतीपासून दूर होण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
“जनगणनेची माहिती ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे.
अशा प्रकारे पहिल्यांदाच जनगणनेच्या कामामध्ये मोबाईल फोनचा वापर केला जाणार आहे.
भारत आता पेन आणि पेपर पासून डिजिटल डेटाकडे जात आहे.
ही देशातील जनगणनेच्या कामातील मोठी क्रांती ठरणार आहे,” असं अमित शाह यांनी म्हटलं होतं.
नव्या अॅपमध्ये नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबियांची माहिती अपलोड करता येणार आहे.
देशभरात १६ भाषांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार असून त्यासाठी १२,००० कोटी रुपयांची गरज पडणार आहे, असंही शाह म्हणाले होते.

Previous articleखेड तालुक्यातील मेटे गावातील (पाटील वाडी) मधील शिवसेना शाखा अध्यक्ष सह कार्यकर्त्यांचा मनसे मध्ये जाहीर प्रवेश 🛑
Next articleदेवमामलेदार यशवंत महाराजांचा त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here