क्रांतीकारी मदनलाल धिंग्रा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…

0
43

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210202-WA0058.jpg

क्रांतीकारी मदनलाल धिंग्रा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…
मुखेड तालुका प्रतिनिधी
दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी हॉटेल दुर्गाअंकुर नांदेड येथे सकाळी 11:30 वाजता सौ. क्रांती वडजे लिखित क्रांतीकारी मदनलाल धिंग्रा या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. श्यामल पत्की कुरुंदकर यांच्या हस्ते क्रांतिकारी मदनलाल धिंग्रा या पुस्तकांचा फोटो कव्हर करून फुले अर्पण करून प्रकाशन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.भगवान अंजलीकर यांनी भूषवले. क्रांतिकारकांचे जीवन चरित्र भावी पिढीसाठी अत्यंत स्फूर्तिदायक असून बाल वाचकावर संस्कार करणार्‍या आहे असे कौतुक करून लेकीचे भावना विषद केली. प्रा. सौ. श्यामल पत्की यांनी क्रांतिकारी मदनलाल धिंग्रा यांनी देश प्रेमासाठी शत्रूंच्या देशात जाऊन एका उच्चपद अधिकारी कर्झन वायली यांच्या हत्या केली ही गोष्ट आजच्या पिढीला माहीत नाही इतिहासावर करण्यात कार्य क्रांती वडजे यांनी केली. अशी प्रशंसा केली मनोगत व्यक्त करताना सौ. क्रांती वडजे यांनी मी आज 32 वर्षापासून कमला नेहरू मागासवर्गीय मुलीचे वस्तीग्रह चालविते व अध्यक्ष या नात्याने लहान मुलीवर योग्य संस्कार होणे किती गरजेचे आहे तसेच संस्कार सक्षम पुस्तकांचं चांगले संस्कार करू शकतात याची खात्री पटली यासाठी क्रांतिकारक बदल महापुरूषा बाबत माझ्या मनात अत्यंत आदर निरंतर आधार आणि प्रेमाची भावना असल्याने मी हे पुस्तक लिहिले आहे सदर कार्यक्रमा करीता ईश्वर मतवाले, अशोक कोरडे यांची प्रमुख उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here