मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.)येथे भाजपा चे गंगाधर पाटील अंबुलगेकर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क व सानी टायझर चे वाटप

0
43

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210202-WA0031 IMG-20210202-WA0063.jpg

मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.)येथे भाजपा चे गंगाधर पाटील अंबुलगेकर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क व सानी टायझर चे वाटप
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु.) येथे दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा येथील विद्यार्थी व शिक्षकांना मास्क व सानीटायझरचे वाटप भारतीय जनता पार्टीचे नेते गंगाधर पाटील आंबुलगेकर यांच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने कोरोना covid-19 महामारी चा प्रादुर्भाव कमी झाल्याने इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरू करण्यात आले असून प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्क बांधणे बंधनकारक असून त्यामुळे शिक्षकांची व विद्यार्थ्यांची काळजी लक्षात घेता गंगाधर पाटील आंबुलगेकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मास्क व सानीटायझर वाटप करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी हूलाजी रॅपनवाड, प्रतिष्ठित व्यापारी बाबू सावकार उलीगडे, पत्रकार विठ्ठल कल्याण पाड, बालाजी पाटील कदम, बाळू पाटील कदम, यांच्यासह गावातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

Previous articleसटाणा मालेगाव रस्त्यावर ब्राम्हणगांव येथे मोटारसायकल चा अपघात
Next articleक्रांतीकारी मदनलाल धिंग्रा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here