एसटी.कर्मचारी प्रकाश कदम यांची ३२वर्षे सेवा बजावुन सेवानिवृत्त

0
65

पेठ वडगांव :  नरंदे येथील श्री.प्रकाश कदम (वाहक) आज इचलकरंजी आगारामध्ये सलग १५ वर्षे सेवा बजावून सेवा निवृत्त झाले.
आज ते संपूर्ण कोल्हापूर विभागात एकटेच प्रकाश कदम सेवा निवृत्त झाले आहेत.
कदम हे मूळचे नंरदे ता.हातकणंगले येथील रहीवाशी आहेत .ते एसटी महामंडळामधे १९८८ साली रूजू झाले त्यावेळी त्याना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आगारामधे नोकरी करण्याची संधी मीळाली त्यांनी सलग १८ वर्षे दापोलीत नोकरी केली , त्यानंतर ते इचलकरंजी आगारामधे बदलुन आले ते एसटी कर्मचाऱ्यांना नेहमी वैद्यकीय बिलाची मोफत कामे करून देत होते तसेच इतर कर्मचाऱ्यांना अडीअडचणीत नेहमी मदत करत होते.
त्यांनी १९८८ ते २०२१ पर्यंत एकूण ३२ वर्षे प्रामाणिकपणे एसटी ची नोकरी केली.
आज सेवानिवृत कदम (वाहक) यांचा सत्कार करताना आगार व्यवस्थापक संतोष बोगरे ,चालक जावेद बागवान , राहुल आरगे , बी.ए.घोरपडे, जे.आर.पाटील ,उमेश मोहीते ,दिपक सवाईराम , राजू तळंदगे , मोतीलाल जमादार , श्रीकांत जाधव, सौ.सारीका जाधव आणि इचलकरंजी आगारातील चालक ,वाहक, यांत्रिकी कर्मचारी उपस्थित होते.

संकलन- मोहन शिंदे युवा मराठा न्युज नेटवर्क

Previous articleकोल्हापूर शहर-जिल्हा काँग्रेस सेवादल च्या वतीने धरणे आंदोलन
Next articleआपली जनतेशी बांधिलकी आहे ती अधिकाधिक मजबूत करण्याचे काम करा-जयंत पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here