रायगड जिल्ह्यात लाच घेताना गट शिक्षणधिका-याला अटक …!!

0
69

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210129-WA0158.jpg

रायगड जिल्ह्यात लाच घेताना गट शिक्षणधिका-याला अटक …!!
(अरुण कुंभार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
रायगड-पनवेल पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे हे लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
सेवापट व एलपीसीसाठी लाच स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये मोठीच खळबळ उडाली आहे.
आज शुक्रवारी (ता.२९जानेवारी)दुपारच्या सुमारास रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.प्रभारी गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सेवापट व एलपीसीसाठी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.याबाबत तक्रार आल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली आणि आज ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या एका दालनात ठरल्याप्रमाणे दहा हजाराची रुपयांची लाच घेताना नवनाथ साबळे यांना रंगेहाथ पकडण्यात येऊन अटक करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here