मुखेड तालुक्यातील तब्बल 70 ग्रामपंचायतीवर काँग्रेस व मित्र पक्षाचे वर्चस्व माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोगरेकर

0
48

राजेंद्र पाटील राऊत

20210123_060843.jpg

मुखेड तालुक्यातील तब्बल 70 ग्रामपंचायतीवर काँग्रेस व मित्र पक्षाचे वर्चस्व माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोगरेकर
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर काँग्रेस व मित्र पक्षाचे वर्चस्व माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा दावा.नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व मित्र पक्षाने तब्बल70 ग्रामपंचायतीवर ताबा मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून गावागावातील वाद व तंटे मिटवून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात यावेत यासाठी मा. हानमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या सह पदाधिकारी प्रयत्न करीत होते. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकली नाहीत काँग्रेस व मित्रपक्षांच्या सहकार्याने गाव पातळीवरील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून एकजुटीने निवडणुका लढवण्याचे प्राप्त केले आहे. अशी माहिती मुखेड कंधार मतदार संघाचे माजी आमदार माननीय हानमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here