नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात 5 वर्षीय बालिकेवर

0
85

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210122-WA0172.jpg

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात 5 वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ कडकडीत बंद!             देगलूर,( संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- भोकर तालुक्यातील दिवशी या गावातील मन हेलावून टाकणारी थरारक घटना घडली असून, शेतावर ठेवण्यात आलेल्या एका सालगडीनेच शेत मालकाच्या अवघ्या पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून नंतर त्या मुलीला ठार मारलं.ही भयानक कृत्य करणाऱ्या त्या आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी. यासाठी पूर्ण भोकर शहर व सर्वपक्षीय कार्यकर्ते महिलावर्ग लहानापासून ते मोठ्यापर्यंत या मोर्चात सहभागी होऊन एकच मागणी केली, त्या आरोपीला पोलिस ठाण्यातून बाहेर काढून भर चौकात जाळण्यात यावा, किंवा फाशी देण्यात यावी. या घोषणेने संपूर्ण भोकर शहर हादरून गेला होता.आरोपी बाबू खंडू सांगेराव या हरामखोराने आपल्याच मालकाची लहान पाच वर्षीय मुलगी खेळत असताना त्याची नजर त्या मुलीवर गेली. व घरी कोणी नसल्याचे पाहून त्या निष्पाप मुलीला पळवून नेऊन तिच्यावर या नराधमाने बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. व मृतदेह तेलंगणाच्या सीमेजवळ सुधानदीपात्रात फेकून देण्यात आला होता. आणि नदीच्या मध्यभागी नदीपात्रातच लपून बसला होता. घरच्या मंडळीने घरी आल्यानंतर मुलगी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. इकडे तिकडे शोधाशोध केली. त्यानंतर त्याचा सालगडी बाबू खंडू सांगेराव यांनी पळून नेल्याचा संशय आल्याने, भोकर पोलीसात ही माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी ताफा घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. व आरोपीचा शोध घेत असताना, आरोपी हा नदीपात्रात लपून बसल्याचे त्यांना दिसून आले. त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत असताना, संतापलेल्या जमावाने त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाल रांजणकर पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत कांबळे घटनास्थळी ताबडतोब पोहोचले. त्यांनी जमावाला परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगून, परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी ताब्यात घेऊन भोकर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. व त्या आरोपीने सर्व गुन्ह्याची कबुली दिली गेली. या घटनेचा निषेध म्हणून भोकर शहर कडकडीत बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here