कोटबेल ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बिबाताई खैरनार यांचा बहुमताने विजय..!!

0
49

राजेंद्र पाटील राऊत

20210121_065130.jpg

कोटबेल ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बिबाताई खैरनार
यांचा बहुमताने विजय..!!
मालेगांव,( श्रीमती आशा बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-एका सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील महिला,राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पहिल्यांदाच उमेदवारी करुन बहुमताने निवडून येत ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून राजकारणात दमदार एन्ट्री केली.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या कोटबेल गावाच्या शेतकरी व सर्वसामान्य कुटूंबातील असलेल्या महिला सौ.बिबाताई देवाजी खैरनार यांनी यावेळी कोटबेल गावाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत वाँर्ड क्रमांक ४ मधून उमेदवारी करीत सुरुवातपासूनच जोरदार प्रचार केल्याने त्यांचा २८८ मते मिळवून दणदणीत विजय झाला आहे.तर सौ.बिबाताई खैरनार यांच्या या निवडीचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.
कोटबेल गावाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द राहू व जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असे नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्या सौ.बिबाताई खैरनार यांनी “युवा मराठा न्युज”शी शेवटी बोलताना सांगितले.

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे केरूर येथे ह.भ.प.परमेश्वर महाराज शहापूरकर यांचे कीर्तन अमृताचा सोहळा संपन्न
Next articleनांदेड जिल्ह्यात पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here