देगलूर तालुक्यातील करडखेड येथील डॉ.आकाश देशमुख यांच्या पॅनलचा दणदणीत विजय   

0
66

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210118-WA0156.jpg

देगलूर तालुक्यातील करडखेड येथील डॉ.आकाश देशमुख यांच्या पॅनलचा दणदणीत विजय                                    देगलूर( संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा  न्युज नेटवर्क)- देगलूर तालुक्यातील करडखेड ग्रामपंचायत निवडणूक 2021 होऊ घातलेल्या निवडणूकीमध्ये 11पैकी 9जागांवर घवघवीत यश प्राप्त करून विजयी झाले. गेल्या पाच वर्षात गावात कसल्याच प्रकारचा विकास झाला नसून, गावातील जनता जनार्दन मतदार बंधूनी नवीन परिवर्तन विकास पॅनलवर विश्वास करून त्यांना भरघोस मतांनी विजय प्राप्त करून त्यांच्या हातात सत्ता स्थापित केली आहे. मागील काळात राहिलेला विकास या नवीन पॅनल कडून सर्व कामे पूर्ण होतील, असे गावातील जनतेमध्ये बोलण्यावरून कळते. निवडून आलेले उमेदवार1) व्यंकट गोनेवार, 2)बाबू कोकणे 3)अरविंद गड्पवार 4)गणपत शिवळवणे 5)शेख फयाज 6)बालाजी इबितवार 7)अशोक अबाजी 8)अंकुश सूर्यवंशी 9)अहमद शेख हे नऊ उमेदवार विजय प्राप्त केले आहेत. या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे गावातील व परिसरातील जनतेतून कौतुक व सत्कार केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here