प्रशांत कोठावदेंना बागलाण भुषण पुरस्काराने केले सन्मानीत 

0
55

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210112-WA0129.jpg

सटाणा,( जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                           निसर्ग मित्र समिती महाराष्ट्र राज्य शाखा सटाणा यांच्या वतीने आज स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी आयोजित केलेल्या निसर्ग मित्र मेळाव्यात  साई सावली फाउंडेशनचे संस्था.अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत  बागलाण भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मा.आमदार संजय चव्हाण, पोलीस उपअधीक्षक मा.शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, देवमामलेदार ट्रस्ट अध्यक्ष भालचंद्र बागड, नगरसेवक महेश देवरे, शिवसेना जेष्ठ नेते अरविंद सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी, निसर्ग मित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे, शहराध्यक्ष संतोष जाधव आदी सह पुरस्कार घेतेवेळी भुषण निकम, योगेश सोनवणे, चेतन सूर्यवंशी, सुमित सोनवणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here