अवकाळी पावसामुळे आर्थिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना   भरपाईच्या मागणीसाठी निवेदन सादर..!!               

0
41

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210111-WA0230.jpg

अवकाळी पावसामुळे आर्थिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना   भरपाईच्या मागणीसाठी निवेदन सादर..!!                                         (जगदिश प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                                         सटाणा● गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने बळाराजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.काळ्या मातीतील पिकांची पुर्णपणे वाट लागली असुन, बागलाण तालुक्यांतील पिकांचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे .त्यामुळे या नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ भरपाई मिळावी या आशयाचे निवेदन तहसीलदार शुभम गुप्ता यांना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष व शेतकरी मित्र बिंदु शेठ शर्मा यांच्या वतीने देण्यात आले.

सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने कांदा, द्राक्ष, हरभरा, भाजीपाला, गहू, आंबा इत्यादी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यांतील लागवड क्षेत्राखालील जवळपास निम्म्या द्राक्षांची `वाट’ लागली आहे. कोरोना व लॉकडाऊन या कारणांमुळे आधीच शेतीचे गणित बिघडलेल्या बळीराजाला अवकाळी पावसानेआर्थिकदृष्ट्या खाईत नेऊन ठेवले आहे. शुक्रवारी (ता. ८)रात्री झालेल्या अवकाळी पावसाने परिसराला चांगलेच झोडपले. यात द्राक्ष, कांदा गहू, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील द्राक्ष आणि कांदा याला मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या मोठ्या संकटानंतर द्राक्ष आणि कांदा निर्यातीचा हंगाम सुरू झालेला असताना गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या नुकसानग्रस्त पिकांची आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करून या नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा जिल्हा संघटक दादा भामरे,दादाभाऊ सुर्यवंशी, सुधाकर पाटील,मोठाभाऊ सोनवणे,संजय सुर्यवंशी,शेखर मुळे,त्र्यंबक भामरे,सुभाष आहिरे आदि उपस्थित होते.

Previous articleअयोध्येत भव्य श्री राम मंदिर बांधण्यासाठी निधी संकलन मोहिमेसाठी बोईसर केशव नगर येथे कार्यालयाचे उद्घाटन
Next articleगोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये दादांना श्रद्धांजली अर्पण : सभागृहाचेही नामकरण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here