कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस , नागरिकांनी स्वेटर ऐवजी रेनकोट परिधान

0
59

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210105-WA0020.jpg

कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस , नागरिकांनी व स्वेटर ऐवजी रेनकोट परिधान

कोल्हापूर जिल्ह्यात हिवाळ्यात अनेक भागांत सोमवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. कोल्हापूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री काही काळ जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. येत्या दोन दिवसांत जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस होईल, अशी शक्यता आहे. हवामान बदलामुळे पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
तसेच पेठ वडगांव शहरातही रात्री पासुन आगमन केले आहे.
काल सकाळपासून आकाश ढगाळले होते. प्रारंभी धुके आणि त्यानंतर ढगाळ वातावरणाने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शहरातील तापमानातही लक्षणीय वाढ झाली. रविवारी १७ अंशांवरील पारा आज २१ अंशांवर गेला. यामुळे थंडी गायब झाली
अचानक पाऊस सुरू झाल्याने सायंकाळनंतर अनेकांनी स्वेटरऐवजी पुन्हा रेनकोट, छत्र्या बाहेर काढल्या. रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे हाल झाले. अनेकांना विक्री बंद करावी लागली. सायंकाळनंतर अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. पावसाने काही ठिकाणी उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता.
मोबाईलवर सद्या एक गमतीदार मेसेज व्यहारल झाला आहे,
पावसाळ्याने उन्हाळ्या बरोबर हिवाळ्याशी युती करुन महापावसाळी आघाडी स्थापन
करून थंडी ला बहुमत असून सत्ते बाहेर केले आहे.

जर ३ पक्ष एकत्र येऊ शकतात तर ३ ऋतु का एकत्र येऊ शकत नाहीत .  अशी नागरिकात चर्चा रंगताना बघावयास मिळत आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous article🛑 चित्रकलेच्या माध्यमातुन अनोखा सन्मान 🛑
Next articleहातकणंगले तालुका फोटो, व्हिडीओग्राफर असोसिएशन अध्यक्ष,उपाध्यक्ष बिनविरोध निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here