हातकणंगले तालुक्यातील एकमेव ग्रामंपचायत मौजे.तासगाव बिनविरोध

0
57

 

आमदार राजूबाबा आवळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद हातकणंगले तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत मौजे.तासगांव बिनविरोध झाली आहे.
हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे मा. आमदार राजूबाबा आवळे यांनी ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करणाऱ्या गावांना शासनाच्या फंडातून विशेष बक्षीस देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार हातकणंगले तालुक्यातील मौजे. तासगाव ग्रामपंचायतीने पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली. तासगावचे नेते माजी.सरपंच मा. शिवाजीराव पाटील( काका) यांनी आमदार राजूबाबा यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कपिल पाटील , वडगांव शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण भैया , माजी. अर्जून कोकाटे , चंद्रकांत गुरव , अनिल गाडवे , तासगांवचे नेते माजी.सरपंच मा.शिवाजीराव पाटील (काका) ,तानाजी पाटील , कृष्णात पाटील( सर)
इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते .
ग्रामपंचायत तासगांव बिनविरोध झाल्याने गुलालाची उधळन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला व संपूर्ण गावात आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

 

Previous articleअंबपवाडी,मनपाडळे गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा, मा.आमदार राजू बाबा आवळे
Next articleमाझी कैफियत जनतेच्या दारात निवडणूकीच्या रणधुमाळीत कुणाला चढवणार कुणाला आपटवणार….!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here