पत्रकारांना धक्काबुक्की करणा-यांवर कडक कारवाई करण्याची शीतल करदेकर यांची मागणी

0
59

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210102-WA0086.jpg

पुणे २ जानेवारी⭕ (युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕
पत्रकारांना धक्काबुक्की करणा-यांवर कडक कारवाई करण्याची शीतल करदेकर यांची मागणी
मुंबई/-
– पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभास व्यासपीठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ,पत्रकार फोटो जर्नालिस्टस व विडियो जर्नालिस्टस ना महापौरांच्या आदेशाने प्रवेश नाकारल्याने ,सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला ,हा निंदनीय प्रकार असून नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र याचा तीव्र निषेध करत आहे अशा शब्दात एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी टीका केली आहे.

. झी २४ तास चे अरुण मेहत्रे , न्यूज 18 लोकमत वैभव सोनावणे , TV 9 च्या अभिजित पिसे ,अश्विनी सातव आदींना या धक्काबुक्कीचा फटका बसला . यावेळी या सर्वांनी महापौरांना प्रत्यक्ष भेटून आपण नवीन वर्षाचे आम्हास चांगले गिफ्ट दिले असे सांगत निषेध नोंदविला …
*याप्रकरणी पुणे महापौरांनी माध्यमकर्मींना स्टेजमागे ठेवण्याचा आदेश का द्यावा,पत्रकारांची अडचण का व्हावी आणि अशा प्रकारे अपमानित का केले गेले याचे उत्तर महापौरांनी दिले पाहिजे.
आणि या कृतीस जबाबदार असलेल्यांनी माध्यमकर्मींची जाहीर माफी मागावी अशी मागणीही करदेकर यांनी केली आहे*

Previous articleसुरगाणा -कळवण भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच केलं मोठं नुकसान
Next articleनांदेड जिल्ह्यातील वाळू घाटांना सापडला अखेर मुहूर्त जिल्ह्यातील 32 रेतीघाटांचा आजपासून लिलाव..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here