मुखेड तालुक्यातील मौजे भग नुरवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा दुसऱ्यांदा भगवा फडकला ग्रामपंचायत निवडणूक झाली बिनविरोध..

0
50

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210102-WA0031.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे भग नुरवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा दुसऱ्यांदा भगवा फडकला ग्रामपंचायत निवडणूक झाली बिनविरोध..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे भगनुर वाडी येथील ग्रामपंचायतीवर दुसऱ्यांदा भगवा फडकला आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पडली. विद्यमान सरपंच संतोष पाटील इंगळे भगनुर वाडीकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व सात सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून सलग दुसऱ्यांदा भग नुरवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष उत्साहात साजरा केला. भगनुरवाडी ग्रामपंचायतीवर दहा वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे . विद्यमान सरपंच संतोष पाटील इंगळे यांनी गावाच्या विकासास चालना दिल्याने सदरील ग्रामपंचायत बिनविरोध निघाली गावकऱ्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अनुराधा संतोष इंगळे अमोल जिंकवाड सुभाष जिंकवाड बालाजी बोईनवाड अनुसयाबाई जिंकवाड लक्ष्मीबाई जिंकवाड अहिल्याबाई जिंकवाड यांचेच अर्ज असल्याने सदरील ग्रामपंचायत बिनविरोध निवडून येणार आहे. ग्रामपंचायत बिनविरोध साठी परमेश्वर मेथे वाड मुरलीधर पाटील आनंदराव इंगळे लक्ष्मण चिकटवाड यांनी सहकार्य केले. शिवसेनेचे संतोष पाटील इंगळे यांनी संपूर्ण गावकऱ्यांचे यांचे आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here