नागांव मध्ये आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन

0
53

 

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील नागांव येथील रस्ते आणि डांबरीकरण कामांसाठी २५/१५ योजनेतून १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन मा. आमदार श्री .राजूबाबा आवळे यांचे हस्ते आज करण्यात आले. आगामी काही दिवसांत नागांव गावासाठी आणखी निधी देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, सरपंच अरुण माळी , आघाडी नेते गुंडा सावंत, दीपक लंबे किरण मिठारी , राहुल पाटील विजय पाटील, सुनील सुतार, माजी सरपंच भिमराव खाडे, नंदू मिठारी, सुनील यादव, किरण लोंढे , गजू पाटील अशोक सोळाकुरे , युवा नेते बबलू लंबे व ग्रा.प सदस्य व ग्रामस्थ, विकास आघाडी व महाविकास आघाडीचे कार्यकते मोठया संख्येने उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here