आंबेडकर घराण्याच्या कुठल्याही सदस्यांची बदनामी सहन केली जाणार नाही

0
52

आंबेडकर घराण्याच्या कुठल्याही सदस्यांची बदनामी सहन केली जाणार नाही रिपाई डेमोक्रॅटिक* देशातील कोणत्याही महामानव व त्यांच्या घराण्याच्या कोणत्याही वंशजाबद्ल अपशब्द सहन केले जाणार नाही अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली. व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणजे लायकी नसतानाही कोणत्याही व्यक्तीमहत्त्वाबद्दल काहीही बोललेले ऐकून घेतले जाणार नाही. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत भाग्यविधाते असून त्यांचे वंशज ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल कवडी मोलाच्या दुर्बुद्धी महिलेने एकेरी बोलून खालच्या पातळीवर सोशल मीडियावर वक्तृवे लिहिले आहे .या वृत्ती प्रवृत्तीचा आरपीआय डेमोक्रेटिक पार्टी जाहीर निषेध व्यक्त करत असून यापुढे कुणीही कोणत्याही महापुरुषाच्या घराण्यातील व्यक्तिमत्त्वाबद्दल अनुदगार काढू नये.अन्यथा आरपीआय डेमोक्रॅटिक अशा प्रवृत्तींना ठेचून काढेल असा इशाराही त्यांनी दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here