यूनाईटेड मराठा ऑर्गनिझशन (UMO) चा स्तुत्य उपक्रम: अनिकेत सेवाभावी संस्था, पुणे इथे वस्तूंचे वाटप

0
152

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201227-WA0034.jpg

पुणे २७ डिसेंबर⭕(युवा मराठा न्यूज पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप)⭕
यूनाईटेड मराठा ऑर्गनिझशन (UMO) चा स्तुत्य उपक्रम: अनिकेत सेवाभावी संस्था, पुणे इथे वस्तूंचे वाटप

सोशल मीडिया वर कार्यरत असलेली महाराष्ट्र मधील युनाइटेड मराठा ऑर्गनाइज़ेशन (UMO) ही संघटना काही वर्षात च मराठा समाजातील मुलांच्या भविष्याचा विचार करता शेती, शिक्षण, व्यवसाय, नौकरी आणि आपत्कालीन सेवा या विषयांवर काम करून फेसबुक वर 2.5 लाख मेंबर्स आणि व्हाट्सअप्प चे प्रत्येक जिल्हा चे 36 ग्रुप आणि याचसोबत प्रगतशील शेतकऱ्यांचा, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसाय अशे मिळून 50+ ग्रुप मध्ये 10000+ मेंबर्स जोडले गेलेले आहेत. या संघटनेचे संस्थापक सदस्य कै. प्रशांत मधुसूदन शिंदे यांचे मागच्या वर्षात आपत्कालीन निधन झाला. 20 डिसेंबर रोजी त्यांच्या पुण्यतिथी निम्मित आणि 26 डिसेंबर रोजी त्यांची प्रथम जयंती चा योग साधून युनाइटेड मराठा ऑर्गनाइज़ेशन (UMO) टीम मेंबर ने बावधन खुर्द येथे असलेल्या अनिकेत सेवाभावी मानसिक विकलांग मुलांची संस्था येथे काही गरजेच्या वस्तूंची मदत करून, त्या मुलांसोबत काही वेळ मजा मस्ती करत अनोख्या प्रकारे अभिवादन केले आहे.
हा उपक्रमाचे सर्व स्तरातून युनाइटेड मराठा ऑर्गनिझशन (UMO) परिवाराचे कौतुक होत आहे. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सदस्य सचिन देसाई, ज्योती गायकवाड, ज्ञानेश्वर मिरकले, चैतन्य पताळे, उमेश नाईकवाडे, कुणाल हंगरगे यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य सकाळ वर्तमानपत्राचे पत्रकार महादेव पवार सर आणि अनिकेत संस्थाच्या अध्यक्ष कल्पना वरपे मॅडम यांचे मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here