वडगांव शहरातील दत्तनगर मधील ओढाच (नाला) गायब

0
55

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201226-WA0119.jpg

वडगांव शहरातील दत्तनगर मधील ओढाच (नाला) गायब

वडगांव : हातकणंगले रोडवरती पोलीस स्टेशन समोर दत्तनगर, शिवाजी नगर  मधून जाणारा ओढा (नाला) गायब होत चालला आहे. मौजे तासगाव माळावरून आलेला व डॉ. अजित पाटील यांच्या दवाखान्याच्या पूर्वेला आणि समोरील पेट्रोल पंपाच्या खालुन गेलेला पाण्याचा ओढा काही अधिकृत वा अनाधिकृत बांधकामामुळे गायब होत चाललेला असून त्याकडे वडगांव नगरपालिका प्रशासनाने जाणून-बुजून व संगनमताने दुर्लक्ष केले आहे.
सदर ओढा मुरूम टाकून बुजवून ओढ्याची रूंदी कमि करून त्यामध्ये सिंमेंट पाईप टाकून सदर ओढ्यावरील जागेवर अतिक्रमण  केले आहे.
सदर ओढ्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असून तेथील काही बांधकामामुळे ओढ्याची खोली व रुंदी पूर्णपणे कमी झाले असून ओढ्याचे पाणी शिवाजीनगर व दत्तनगर मधील काही घरात पाणी शिरत असून वारंवार वडगांव नगरपालिकेत लेखी स्वरूपात  तक्रार  दाखल करून देखील दत्तनगर मधील व शिवाजी नगर मधील नागरिकांची जाणून-बुजून दखल घेतली जात नाही .
सदर ओढा पूर्वीपासून तासगाव माळ , मार्केट कमिटीच्या पाठीमागील बाजूने व डॉ. अजित पाटील यांच्या पूर्वेकडून आलेला आहे त्याची रूंदी कागदोपत्री विस ते पंचवीस फुट इतकी आहे. डॉ. अजित पाटील यांच्या हॉस्पिटल व सत्यअनंत मंगल कार्यालय पर्यंत ओढ्याची ची लांबी रुंदी मोठी आहे. पण तेथे शेजारी ओढ्यावरच पेट्रोलपंपाचे बांधकाम झाल्याने  .
पंपा खालुन ओढा गेल्यामुळे ओढ्याची लांबी रुंदी पूर्णपणे कमी झाल्याने पाण्याचा प्रवाह ओढ्याच्या बाहेर येऊन  येथील रहिवाशांच्या  काही घरामध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी  शिरत असून तेथील रहिवास्यांना नाहक त्रास होत आहे.
सदर ओढ्याची पुर्वीप्रमाणे लांबी रूंदी करून प्रवाहाचे पाणि न साचता त्याचा निचरा व्यवस्थित व्हावा अशी तेथील स्थानिक रहिवाश्यांची मागणी पालिका प्रशासनाकडे होत आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleमायक्रोफायनान्स कर्जे ही कोणत्याही कर्ज माफी योजनेचा भाग नाहीत
Next articleदत्त जयंती निमित्त वडगांवमध्ये विश्वशांतीसाठी महामृत्युंजय यज्ञ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here