नायगाव- मुगाव पाटीजवळ अपघातात दोन जण ठार         

0
48

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201224-WA0092.jpg

नायगाव- मुगाव पाटीजवळ अपघातात दोन जण ठार           अज्ञात वाहनाच्या धडकेत काल दिनांक 23 डिसेंबर रोजी दोन जण ठार झाले असून, नायगाव तालुक्यातील मुगाव पाटी जवळ ही घटना घडली. नायगाव तालुक्यातील धनज येथील दोन तरुण गोविंद शंकर भोसले वय 19, व पांडुरंग प्रकाश सूर्यवंशी व 24 हे दोघे ठार झाले असून, हे दोघेजण काल दिनांक 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी शेताकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्रीच्या अकरा वाजेच्या दरम्यान नरसी ते मुखेड या रोडवरील मुगाव पाटीजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. ते बरेच वेळ रोडवर पडून होते कारण नांदेड जिल्ह्यात कडाक्याची थंडी असल्यामुळे रोडवर वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. ही बातमी नायगाव पोलीस स्टेशनला समजताच पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ साहेब यांनी एक हवालदार घेऊन घटनास्थळी ताबडतोब जाऊन जखमींना ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे आणण्यात आले. मात्र एकाचा मृत्यू झाला होता. व दुसरा नांदेड येथे उपचारासाठी नेले असता, उपचार चालू असताना त्याचा पण मृत्यू झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक पडवळ साहेब यांनी दिली. एकाचा कमरेखालील भागाचा चुराडा झाला होता तर दुसऱ्याचे डोक्याला जबर मार लागल्यामुळे दोघेही वाचू शकले नाहीत. या प्रकरणी नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क देगलूर

Previous articleकोरोनाच्या साईड इफेक्टमुळे महिलेच्या शरीरात पस
Next articleगोजेगाव शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त ..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here