सरपंच आरक्षण सोडतीला विरोध हायकोर्टात याचिका दाखल

0
48

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201224-WA0031.jpg

सरपंच आरक्षण सोडतीला विरोध हायकोर्टात याचिका दाखल देगलूर,(संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)राज्य सरकारने घेतलेल्या ग्रामपंचायतीच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून, निवडणूकीनंतर आरक्षण सोडत नको, असे म्हणत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यातील 14234 ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सुरू आहे. पण ग्रामपंचायतीच्या निर्णयाला आव्हान देणारी एक महत्त्वपूर्ण याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे.औरंगाबाद खंडपीठातील वकील देविदास शेळके यांनी ही याचिका सादर केली आहे. निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढणे हा निर्णय घडत्या दृष्ट्या अवैध असल्याची भूमिका या याचिकेत घेण्यात आली आहे. ही याचिका अद्यापही न्यायालयाने दाखल करून घेतली नाही, मात्र या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी कोर्टाने सात तारखेला न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालय निर्णय देईल,याकडे राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे व अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous articleस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली
Next articleतालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी पंधरा लाखाचा निधी – आ . संजयमामा शिंदे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here