सरपंचच निवडणूकीनंतर ठरणार तर पॅनलचा खर्च कुणी करायचा ? गाव पुढारी पडले पेचात

0
44

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201220-WA0049.jpg

सरपंचच निवडणूकीनंतर ठरणार तर पॅनलचा खर्च कुणी करायचा ? गाव पुढारी पडले पेचात
प्रतिनिधी = किरण अहिरराव

औरंगाबाद । राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळं गावाचं सरपंचपदावर विराजमान होण्याची इच्छा मनी असलेल्या अनेकांनी आपापल्या गावात मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र या आनंदावर राज्य सरकारच्या एका परिपत्रकांन पाणी फिरवलंय. (Sarpanch Candidate) कारण सरपंचपदाचे आरक्षण हे ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे गावातील पॅनलचा खर्च कुणी करायचा असा प्रश्न गावपुढाऱ्यांसमोर आहे. (Gram Panchayat election Panal)

गावागावात सरपंचपदावर डोळा ठेवून पॅनल प्रमुखांकडून किंवा सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना, निवडणूक रिंगणात उतरवले जातात .

स्वतःबरोबर या उमेदवाराचा खर्च संबंधित पॅनल प्रमुख उचलत असतात. यंदा मात्र सरपंच कोण होणार हे गुलदस्त्यात आहे. सरपंचपदाची आरक्षणाची सोडत ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर होणार आहे. त्यामुळे नको ती आफत म्हणण्याची वेळ पॅनलप्रमुख आणि सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या लोकांसमोर आली आहे. कारण खर्च केला आणि आरक्षणात भलतंच आलं तर अशी भीती या पुढाऱ्यांसमोर आहे.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाने गावागावातला नूर पालटला आहे. यापूर्वी प्रत्येक वेळेस निवडणुकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सगळी यंत्रणा राबविली जाते. उमेदवारांच्या उमेदवारी खर्चापासून ते प्रचारयंत्रणेपर्यंतचा खर्च उचलला जातो. मात्र यंदा सरपंचपद कोणाकडे जाणार हे निवडणुकीनंतर कळणार आहे. त्यामुळे खर्च कुणी आणि कोणासाठी करायचा हा मुद्दा उपस्थित झाला आहे. एकीकडे खर्च कुणी करायचा हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे, गावागावात निवडणुकाच्या दरम्यान लोकशाहीच्या उत्सावाप्रमाणे जो माहोल असतो तो सध्या तरी पाहायला मिळत नाही. गावकारभार पाहणारी सुज्ञ राजकारणी यातून आता कसे मार्ग काढतात आणि सरपंच पदी विराजमान होतात हे पाहावे लागेल.

Previous articleरावळगाव कारखान्यासमोर आमरण उपोषणाचा इशारा
Next articleग्रामपंचायत निवडणुकीत स्वयंघोषणापत्रावर कागदपत्रे घ्या. राज्य ग्रामसेवक युनियनची एका निवेदनाद्वारे मागणी..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here