आज २० डिसेंबरला बल्लारपूर बामणीत ओबीसी आरक्षण बचाव परिषद ओबीसींच्या विविध मागण्यांवर विचारमंथन होणार

0
44

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201218-WA0093.jpg

आज २० डिसेंबरला बल्लारपूर बामणीत ओबीसी आरक्षण बचाव परिषद
ओबीसींच्या विविध मागण्यांवर विचारमंथन होणार

चंद्रपूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघ बल्लारपूरच्या वतीने जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे, या मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव परिषद येत्या २० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील निवलकर लॉन येथे आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेत ओबीसींच्या जातीनिहाय जणगणनेवर विचारमंथन होणार आहे.
आरक्षण बचाव परिषदेचे उद्द्याटन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या हस्र्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी ओबीसी नेते बबनराव फंड राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सुभाष ताजणे, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे उपस्थित राहणार आहे. या ओबीसी परिषदेदरम्यान सन २०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेवर विचारमंथन केले जाणार आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, वर्ग ३ व ४ पदाचे ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, ओबीसी विद्याथ्र्यासाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी, ओबीसी समाजासाठी घरकुल योजना सुरू करावी यासह विविध २१ मागण्या शासन दरबारी लावून धरण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. ओबीसी परिषदेला मोठ्या संख्येन समाजबांधवांनी उपस्थित दर्शवावी असे आवाहन बल्लारपूर तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष गणपती मोरे, उपाध्यक्ष कार्तिक जीवतोडे, सचिव राजेश बट्टे, सहसचिव सुरेश पंदीलवार, कार्याध्यक्ष दिवाकर झाडे, राजेश खेडेकर, राजू निखाडे, संदीप पोडे, अविनाश जमदाडे, ऋषी पिपरे, ज्ञानेश देरकर, वैभव साळवे, सुभाष काळे, उमेश सपाटे यांनी केले आहे.                    युवा मराठा न्युज नेटवर्क

Previous articleमा. गो. वैद्य यांचे निधन
Next articleनवीन वर्षात मिळणार नव्या रूपात ATM स्मार्ट रेशन कार्ड 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here