पहिला Nokia PureBook X14 लाँच; आता नोकियाचा लॅपटॉपही आला 

0
48

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201215-WA0012.jpg

पहिला Nokia PureBook X14 लाँच; आता नोकियाचा लॅपटॉपही आला

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 15 डिसेंबर :  नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची बाजारात एन्ट्री झाली आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने सोमवारी Nokia PureBook X14 लॅपटॉप लाँचची घोषणा केली आहे. नोकियाच्या या लॅपटॉपचं प्री-बुकिंग 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

काय आहेत या लॅपटॉपचे फीचर्स :-

Nokia PureBook X14 लॅपटॉपमध्ये 8GB DDR4 RAM आणि 512GB NVMe SSD सह इंटेल i5 10th Gen क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. विंडोज 10 ओएस असणाऱ्या या लॅपटॉपला 14 इंची फुल एचडी LED बॅकलिट स्क्रीन देण्यात आली आहे.

या लॅपटॉपचं वजन 1.1 किलोग्रॅम आहे. साउंडसाठी लॅपटॉपमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी 1.1 Ghz टर्बो GPU सह इंटीग्रेटेज इंटेल UHD 620 ग्राफिक्स कार्ड असेल.

लॅपटॉप 8 तास बॅटरी लाईफसह असेल. बॅटरी लवकर चार्ज होण्यासाठी यात 65W फास्ट चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल बँड वाय-फाय, सिंगल HDMI पोर्ट, यूएसबी 3.1, ब्लूटूथ 5.1, यूएसबी 2.0 आणि RJ45 पोर्ट आहे. तसंच सिंगल ऑडिओ आउट पोर्ट आणि एक माईक पोर्टही आहे.

लॅपटॉपला मिळणाऱ्या अ‍ॅडिशनल फीचरमध्ये विंडोज हॅलो फेस अनलॉक, HD IR वेबकॅम, अजेस्टेबल बॅकलाइट किबोर्ड आणि मल्टिपल जेस्चर टचपॅड देण्यात आला आहे. Nokia PureBook X14 लॅपटॉपची किंमत 59,990 रुपये इतकी आहे.

Previous articleमहिलांवर अत्याचार करणाऱ्याला २१दिवसात शिक्षा
Next articleदिव्यांगाना मिळणारा केंद्र शासनाच्या पुरस्कार 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here