व्ही.पी.एल. स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक मिडियाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर,मा.आमदार मिणचेकर

0
60

 

हातकणंगले तालूक्यातील पेठ वडगांव शहरात प्रथमच आय.पी.एल. नंतर व्हि. पी.एल.ची भव्य अशी वडगांव प्रिमीयर लिग 2020 ” हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबावाडी (वडगांव) येथे सुरू आहे. वडगांव प्रीमियर लिग स्पर्धेला भेट देण्यासाठी हातकणंगले तालुक्याचे  माजी. आमदार डाँ.सुजित मिणचेकर आले होते. उत्कृष्ट असा नियोजन व बद्ध क्रिकेट स्पर्धेच आयोजन केल्या बद्दल सर्व संयोजक , आयोजक आणि खेळाडूंच आमदार मिणचेकर यांनी अभिनंदन केले. यावेळी एस.सी. सुपरकिंग विरूध्द राम रायल चालेंजर्स सामणा पाहण्याचा आंनद यावेळी मान्यवरांनी घेतला.
तसेच आमदार मिणचेकर यांचे स्वागत श्री.संतोष माळी (बंडा) यांनी केले. यावेळी आमदार मिणचेकर म्हणाले वडगांव प्रीमियर लिग 2020 अशा प्रकारची ही स्पर्धा शहारातील मोठ मोठ्या ठिकाणी होत असते , आणि अशा प्रकारची स्पर्धा मेट्रोसिटीत होत असते. मात्र पेठ वडगांवच्या सर्वच क्रिकेटप्रेमींनी एकत्र येऊन टेक्नालाँजीचा वापर करून , ग्रामीण भागामधे किंवा नगरपालिका एरीयामधे असेल अशा पद्धतीचं उत्कृष्ट असे संयोजक आत्तापर्यंत मी पहील्यांदाच पाहीले आसेल असे आमदार मिणचेकर यावेळी बोलत होते , ते पुढे म्हणाले खरं तर या स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक मिडियाचा अतिशय चांगल्या पद्धतीने या कमिटीने केला आहे. या स्पर्धेत एखाद्या खेळाडूनं जर चौकार असेल मारला तर त्याच्या लगेच तो मोबाईलच्या अँपवर आँल ओवर वर्ल्ड दिसतो. म्हणजे खऱ्या अर्थाने टेक्नालाँजिचा वापर सुद्धा कमिटीन अतिशय चांगल्या प्रकारे केला त्या बद्दल आमदार मिणचेकर यांनी कमिटीचं धन्यवाद देऊन सर्व खेळाडूंना , संघमालकांना आयोजकांना व प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री.शाहू शिक्षण संस्थेचे कार्यवाहक श्री.अभिजीत गायकवाड , शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री.सुनील माने , श्री.अंकूश माने , युवासेनेचे अध्यक्ष श्री. अनिल माने , उपाध्यक्ष श्री.अक्षय मदने , ग्राहक सेनेचे मनोज जाधव , श्री.अनिल म्हेत्तर , युवा मराठा चे संपादक श्री. मोहन शिंदे , उपसंपादक श्री.रघुनाथ पिसे , युवानेते श्री.सागर भोसले इत्यादी उपस्थित होते.

संकलन-मोहन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क .

 

Previous articleबस चालकाचा हृदयविकाराने चालू ड्युटी मध्ये निधन(
Next articleनवीन मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांचे आवाहन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here