औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकसाठी जिल्ह्यात ६४.०७ टक्के मतदान

0
49

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201202-WA0038.jpg

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकसाठी
जिल्ह्यात ६४.०७ टक्के मतदान

नांदेड,दि.२ ; राजेश एन भांगे

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी नांदेड जिल्ह्यातील वृध्दांसह नवीन पदवीधर मतदारांनी उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला . जिल्ह्यात अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने कुठेही अनुचित प्रकार न होता मतदान 64.07 टक्के झाले. जिल्ह्यातील मतदार यादीनुसार एकूण 49 हजार 285 एवढे मतदार असून यात 10 हजार 853 स्त्री, 38 हजार 432 पुरुष मतदार आहेत. जिल्हाभर विखुरलेल्या मतदारांना मतदान करणे सोयीचे ठरावे यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने 123 मतदान केंद्र उभारली होती. सकाळी 8-00 ते सांयकाळी 5-00 पर्यंत हे मतदान कोविडअतंर्गत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करुन घेण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर, ऑक्सीमीटर व प्रत्येकाचे तापमानही तपासण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील एकूण 123 मतदान केंद्रावर सांयकाळी 5-00 वाजेपर्यंत 64.07 टक्के मतदान झाले. यात नांदेड तालुक्यातील 30 मतदान केंद्रावर 56.72 , मुखेड तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 66.78 टक्के , अर्धापूर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 69.58 टक्के , भोकर तालुक्यातील सहा मतदान केंद्रावर 67.70 टक्के, उमरी तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 76.90 टक्के, कंधार तालुक्यातील नऊ मतदान केंद्रावर 62.71 टक्के, लोहा तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 63.48 टक्के, किनवट तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर 67.25 टक्के, माहूर तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 74.92 टक्के, हदगाव तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 70.87 टक्के , हिमायतनगर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 70.76 टक्के, देगलूर तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 67.55 टक्के, बिलोली तालुक्यातील सहा मतदान केंद्रावर 70.92 टक्के, धर्माबाद तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 69.64 टक्के, नायगाव तालुक्यातील सात मतदान केंद्रावर 69.16 टक्के, मुखेड तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर 67.28 टक्के एवढे मतदान झाले . यात संपूर्ण जिल्हाभर 26 हजार 331 पुरुषांनी तर 5 हजार 247 स्त्री मतदारांनी मतदान केले. एकूण 49 हजार 285 मतदारांपैकी 31 हजार 578 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदाराच्या टक्केवारीत हे प्रमाण 64.07 टक्के ऐवढे होते.

Previous articleढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचे पिक धोक्यात..
Next article” शेतकऱ्यांना अशी वागणूक मिळणार असेल तर पुरस्काराचं काय करू?” ; 30 खेळाडूंची ‘ पदकवापसी ‘ ची तयारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here