“संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान,सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम व असासर्गजन्य आजार रुग्णशोध व जनजागृती अभियानाचे उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांचे हस्ते उद्घाटन’’…..

0
48

“संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान,सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम व असासर्गजन्य आजार रुग्णशोध व जनजागृती अभियानाचे उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ
यांचे हस्ते उद्घाटन’’…..

संयुक्त क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम सर्व्हेक्षण 1डिसेंबर पासुन
(श्रीमती आशा बच्छाव यांजकडून)-
मालेगाव : जिल्ह्यात अद्यापही निदाना पासून वंचित असणाऱ्या क्षयरोग कुष्ठरुग्ण, गृहभेटीव्दारे शोधून काढण्यासाठी रुग्णशोध मोहीम राबविण्याचे ठरविलेले आहे. कोव्हिड 19 च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाचे तुलनेत अत्यंत कमी झालेले आहे. भारत सरकार यांच्याकडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक उपाययोजना म्हणून संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवावी. सर्व्हेक्षण मोहीमत कोव्हिड संशयित सापडल्यास त्यांची ही त्वरित तपासणी करण्याच्या सूचना उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी केली.
नाशिक जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग रुग्ण व क्षयरोग रुग्ण शोध मोहीम जिल्हास्तरीय उद्घाटन नाशिक विभागाचे मा उपसंचालक डॉ पी.डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग विभाग डॉ रवींद्र चौधरी, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शैलेशकुमार निकम नाशिक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ तुराबली देशमुख, व सर्व तालुका आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थित राष्ट्पिता महात्मा गांधी यांचे प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
जिल्हात १डिसेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२० या दरम्यान मोहीम राबविण्यात येणार आहे. रुग्ण शोधण्याचे प्रमाण वाढविणे, समाजामध्ये या रोगांबददल जास्तीत जास्त जनजागृती करणे. रोगाबददलची शास्त्रोक्त माहिती लोकांपर्यंत पोहचविणे व लवकर निदान करणे रुग्णांना लवकरात लवकर उपचारावर घेणे. ही या मोहीमेची ध्येय आहेत. १५ तालुक्यांतर्गत कार्यक्षेत्रांची एकूण ३७१०३४५ लोकसंख्या व ७४२०६९ इतकी घरांची निवड करण्यात आलेली आहे. मोहीमेसाठी एकूण ३४७४ पथके व ६९४८ इतके कर्मचारी काम करणार आहेत. मोहीमेसाठी नाशिक ग्रामीण मधील 100 टक्के लोकसंख्या व शहरी भागातील 30 टक्के लोकसंख्या निवडलेली आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तुराबली देशमुख यांनी संगणक सादरीकरणाद्वारे दिली.
डॉ तुराबली देशमुख म्हणाले , एकूण 14 दिवसांच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज एका टिम नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात प्रत्येक पथकाद्वारे दरोरज ठरवून दिलेल्या घरातील सर्व सभासदांची तपासणी करण्यात येईल, महिला सभासदांची तपासणी आशा महिला स्वयंसेविकेमार्फत व पुरुष सभासदांची तपासणी टीम मधील पुरुष कर्मचारी स्वयंसेवका मार्फत करण्यात येईल. ऑटोरिक्षाव्दारे माइकिंग,पोस्टर, बॅनर, माहिती पत्रके, पथनाट्य, आकाशवाणी वरील मुलाखती द्वारे या मोहिमेचे जनजागरण करण्यात येणार आहे.
क्षयरोगाची लक्षणे जसे- दोन आठवडयापेक्षा जास्त खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ.
प्राथमिक टप्प्यात जर औषधे व्यवस्थित नाही घेतली तर औषधाला दाद न देणारा (एम.डी.आर.टी.बी.) रोग होऊ शकतो. एम.डी.आर.टी.बी. चे त्वरीत निदान व्हावे म्हणून सी.बी.नेट मशीन सारखे अदयावत मशीन सी.पी.आर.सामान्य रुग्णालय नाशिक व मालेगाव येथे उपलब्ध आहे. या मशीनद्वारे 2 तासामध्ये टी.बी.आणि एम. डी. आर. (रिफाम्पसिन रेझिन्स्टन्ट ) आहे का नाही हे तपासले जाते. एच.आर.सी.टी./एक्सरे/ सोनोग्राफी इ. तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जातात.
कुष्ठरोगाची लक्षणे जसे- त्वचेवर,फिकट/लालसर,बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड,बधीर,तेलकट,/चकाकणारी त्वचा, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण पणे बंद करता ने येणे
लक्षणे असणा-या व्यक्तींनी मोहीम कालावधीमध्ये घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना व स्वयंसेवकांकडून योग्य ती माहिती द्यावी व स्वयंसेवकांकडून तपासणी करून घ्यावी. एच.आर.सी.टी./एक्स.रे/ सोनोग्राफी इ. निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या जिल्हा क्षयरोग केंद्रात पूर्णपणे मोफत केल्या जातात. लवकर निदान, उपचार तसेच रुग्ण पोषण आहार इत्यादी योजनांचा लाभ घेऊन जिल्हा क्षयमुक्त व कुष्ठरोगमुक्त,निरोगी करण्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर यांनी केले. युवा मराठा न्युज नेटवर्क

Previous articleपुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान
Next article  कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here