🛑 मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेचे आयोजन 🛑 ✍️ औरंगाबाद :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) औरंगाबाद ⭕मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने औरंगाबाद ते मुंबई पर्यंत उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची सुरुवात २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराज यांना अभिवादन करून होणार आहे. या यात्रेसाठी एका विशेष रथाची निर्मिती केली जात असुन, तो रथ लक्षवेधी ठरणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातुन ही यात्रा निघाल्यावर कायगाव येथे काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करुन पुढे ही कोपर्डी कडे प्रस्थान करणार आहे. कोपर्डी येथे ज्यांच्या मुळे मराठा समाज एकत्र आला त्या श्रद्धाताई मुळे यांना दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अभिवादन करुन, पुढे मराठा क्रांतीची मशाल दि. २९ नोव्हेंबर वडु बुद्रुक येथे पोहोचेल. याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ही मशाल यात्रा शिवनेरी येथे मुक्कामी पोहोचणार आहे. नंतर दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतील माती कपाळी लावुन शिवनेरी ते आझाद मैदान मुंबई उपेक्षित मराठा मशाल जागृती पदयात्रेस प्रारंभ होईल. या पदयात्रेत एकुण ५० मराठा बांधव सहभागी होणार असून प्रत्येक गावोगावी जाऊन शासनाने कोविड १९ संबंधित ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करत मराठा समाजात जनजागृती करणार आहे.  औरंगाबाद ते आझाद मैदान मुंबई असा एकुण १० दिवसांचा प्रवास असुन, यामध्ये शिवनेरी ते आझाद मैदान मुंबई असा प्रवास दररोज २५ किमी पायी चालत करत करत दि. ०७ डिसेंबर रोजी ही यात्रा मुंबईत दाखल होणार आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात शासन चालवुन त्या वेळी उपेक्षितांना न्याय मिळत होता, त्याच पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले सरकार चालवुन उपेक्षित मराठा बांधवांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुख्यमंत्र्यांना भेट देऊन मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करुन द्यावात अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात येणार आहे….⭕

0
46

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201125-WA0021.jpg

🛑 मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेचे आयोजन 🛑
✍️ औरंगाबाद 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद ⭕मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने औरंगाबाद ते मुंबई पर्यंत उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची सुरुवात २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराज यांना अभिवादन करून होणार आहे. या यात्रेसाठी एका विशेष रथाची निर्मिती केली जात असुन, तो रथ लक्षवेधी ठरणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद शहरातुन ही यात्रा निघाल्यावर कायगाव येथे काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करुन पुढे ही कोपर्डी कडे प्रस्थान करणार आहे.

कोपर्डी येथे ज्यांच्या मुळे मराठा समाज एकत्र आला त्या श्रद्धाताई मुळे यांना दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अभिवादन करुन, पुढे मराठा क्रांतीची मशाल दि. २९ नोव्हेंबर वडु बुद्रुक येथे पोहोचेल. याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ही मशाल यात्रा शिवनेरी येथे मुक्कामी पोहोचणार आहे. नंतर दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतील माती कपाळी लावुन शिवनेरी ते आझाद मैदान मुंबई उपेक्षित मराठा मशाल जागृती पदयात्रेस प्रारंभ होईल. या पदयात्रेत एकुण ५० मराठा बांधव सहभागी होणार असून प्रत्येक गावोगावी जाऊन शासनाने कोविड १९ संबंधित ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करत मराठा समाजात जनजागृती करणार आहे.

औरंगाबाद ते आझाद मैदान मुंबई असा एकुण १० दिवसांचा प्रवास असुन, यामध्ये शिवनेरी ते आझाद मैदान मुंबई असा प्रवास दररोज २५ किमी पायी चालत करत करत दि. ०७ डिसेंबर रोजी ही यात्रा मुंबईत दाखल होणार आहे.

ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात शासन चालवुन त्या वेळी उपेक्षितांना न्याय मिळत होता, त्याच पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले सरकार चालवुन उपेक्षित मराठा बांधवांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुख्यमंत्र्यांना भेट देऊन मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करुन द्यावात अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात येणार आहे….⭕

Previous articleदम असेल तर वीज तोडून दाखवाच, राजू शेट्टींचा इशारा
Next article🛑 अजोय मेहता यांनी नरीमन पॉइंट येथे खरेदी केला ५.३ कोटींचा फ्लॅट 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here