मुखेड औरंगाबाद पदवीधर निवडणूक प्रचारार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे

0
45

 मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड औरंगाबाद पदवीधर निवडणूक प्रचारार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक सचिन ढवळे यांची पदवीधर निवडणूक बैठक व सहविचार सभेचे आयोजन मनोहर पाटील मुखेड येथे करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख नामदार बच्चुभाऊ कडू यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्राध्यापक सचिन ढवळे यांचे अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. महापोर्टल घोटाळा उघडकीस आणणारे व महापोर्टल बंद व्हावे यासाठी आंदोलन करणारे सामान्य कुटुंबातील प्राध्यापक सचिन ढवळे यांचा मतदारसंघात प्रचार दौरा सुरू असून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी दिनांक 19 नोव्हेंबर 2020 रोजी मुखेड शहरातील मनोहर टाकीज येथे सकाळी अकरा वाजता बैठक व सहविचार सभा घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष विठ्ठल राव देशमुख देगलूर तालुका अध्यक्ष कैलास येसगे तालुका अध्यक्ष शंकर भाऊ वडेवार शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड मुखेड तालुका सचिव गोपाळ पाटील हिवराळे यांनी केले आहे. या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते

Previous articleअखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या मुखेड तालुकाध्यक्ष पदी यलकटवर यांची नियुक्ती
Next articleमुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here