श्री जयभवानी संस्थेची १२५कोटी ठेवीकडे यशस्वी वाटचाल

0
49

श्री जयभवानी संस्थेची १२५ कोटी ठेवीकडे यशस्वी वाटचाल

युवा मराठा न्यूज

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील श्री. जयभवानी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पेठ वडगांव या संस्थेचा सन २०१९-२०२० या वर्षाचा लाभांश वाटपाचा प्रारंभ आजपासुन करण्यात आला . संस्थेची स्थापना सन १९७६ सालची असुन या संस्थेच्या ठेवींची १२५ कोटीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे या वाटचालीस संस्थेचे आधारस्तंभ श्रीमती विजयादेवी यादव व मार्गदर्शक श्रीयुत गुलाबराव पोळ (माजी पोलीस आयुक्त ) व सौ.विद्याताई पोळ (माजी.नगराध्यक्षा ) व संस्थेचे माजी.चेअरमन श्री.सुनिल हुक्केरी ,सर्व संचालक व समिती सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
वडगांव शहरातील श्री.जयभवानी संस्थेची स्थापना वडगांव नगरीचे रौप्यमोहत्सवी नगराध्यक्ष स्व.विजयसिंह यादव यांनी केली आहे.
या संस्थेचे प्रशस्त मुख्यकार्यालय व शाखा वाठार , शाखा खोची , शाखा हेरले इत्यादी ठिकाणी स्वमालकिच्या प्रशस्त व सुंदर इमारती दिमाखात उभ्या आहेत,
या संस्थेमधे नागरिकांच्या , शेतकऱ्यांच्या व व्यापारी वर्गांच्या सोयीसाठी विजबिल भरणा केंद्र देखील सुरू आहे.
या संस्थेचे नुतन चेअरमन
मा.श्री. विलास कुंडलिक सणगर यांच्या हस्ते लाभांश वाटप करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे माजी संचालक व वडगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री. रणजीतसिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थित व सभासद श्री वीरभद्र चौगुले वडगांव .दि.०९-११-२०२० पासुन चालू वर्षीचा लाभांश वाटपाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी संस्थेचे कर्तव्यदक्ष जनरल मॅनेजर श्री राजकुमार पोळ माजी.नगरसेवक, मॅनेजर श्री प्रसन्न चिंगळे, शाखाधिकारी श्री जगदीश लोळगे , श्री सादिक मोमीन व श्री वसंत मुंदाळे व सरफरोश शिकलगार , शिवाजी सुतार , प्रशांत नायकवडी,राजू पाटील , सौ.अंजली दंताळ , अरूण वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी,
९८५०३२७४७४.

Previous article*सटाण्यात सोमनाथ पवार यास अटक नोकरीच्या नावाखाली केली फसवणूक
Next article*”युवा मराठा”ची सर्वात मोठ्ठी घोषणा* *पत्रकार प्रतिनिधीना देणार एक लाख रुपयाचा अपघाती संरक्षण विमा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here