*एसटी.ड्रायव्हर ते संपादक खडतर* *प्रवास….* *मोहन शिंदेची संघर्षात्मक वाटचाल

0
178

*एसटी.ड्रायव्हर ते संपादक खडतर* *प्रवास….*
*मोहन शिंदेची संघर्षात्मक वाटचाल*
कोल्हापूर , *युवा मराठा न्यूज_*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील एक सर्व सामान्य कुटुंबातील धाडसी व्यक्तीमत्व शिक्षण फक्त १२ वी नापास परिस्थितीमुळे ने पुढे शिकायला मिळाले नाही , काँलेजला असतानाच पार्टटाईम जाब करायचं घरची परिस्थिती बेताचीच रहायला घर भाड्याने मोठे दोन भाऊ ते पण कसेबसे १२वी पर्यंत पार्टटाईम जाँब करायचे वडील खासगी नोकरीत तुटपुंजा पगार कसेबसे घर चालायचे .
मी सर्वात लहान पहील्या पासुनच मनात जिद्द , धाडसी काही करायचं म्हटले तर धाडसाने पुढे जायचं .
पुढे काहीही करायचं कधीकधी ट्रकवर क्लिन्नर म्हणून जायच पण मनात जिद्द फार होती ट्रकवर अनुभव एवढे आले कि अजुन ते दिवस आठवले तर डोळ्यातुन पाणी येत ,
कितीतरी वेळा उपाशी झोपायचे , कधीकधी ड्रायव्हर जेवायचे मला उपाशी ठेऊन कारण गाडीत जेवण बनवायचे , पाचवीला असल्यापासुनच घरी जेवण बनवायचो बहिण नव्हती आई दिवसभर शेतमजुरी करायची त्यामुळे मी घरी आई येईपर्यंत जेवन बनवुन ठेवायचे .
ट्रकवर काम करताना ड्रायव्हर लोकांच्या त्रासाला कंटाळून क्लिन्नरचे काम बंद केले पण एक मात्र शिकलो मनात जिद्द फार होती ड्रायव्हर कशा पद्धतीने गाडी चालवतो हे बघून मी ही गाडी कुठं थांबली ड्रायव्हर बाहेर गेला की मागेपुढे करून शिकलो.
त्यानंतर शेजारी आचारी राहायला होता त्याच्या हाताखाली कधीकधी जायचं ति आवड लागली मी आचारी काम शिकलो दिवाळीचा फराळ , छोटी मोठी जेवण करायचं अस करत करत त्यात ही मन रमत नव्हते .परत ड्रायव्हर काम करू लागलो मित्रांने लायसन काढून दिले .हळुहळु मोठी लायसन , ड्रायव्हर बिल्ला पण काढला मित्राच्या व्हँनवरती काम करत करत त्यानेच लायसन काढायला फार मोलाच सहकार्य केले. लायसन , बिल्ला मिळाल्यावर मनात एकच इच्छा येवू लागली कधी तरी का होईना एक दिवस एसटी.बस चालवायची. लहानपणी कधीतरी गावाला गेलो की ड्रायव्हर च्या मागच्या बाजुला उभे राहयचो समोरून येणारी वाहने पहायला.
हळुहळु छोट्या मोठ्या वाहनावार काम करत करत एकदा आँन लाईन फाँर्म भरून एसटीत नोकरीला संधी मिळाली ते पण घाबरत घाबरत कार २००२ ला बिल्ला काढला होता आणि २०१२ ला नोकरीला एसटीत गेलो .पण गेल्यानंतर सर्व तपासणी करून चाळीस दिवसाच्या ट्रेनिंग मधे फार अनुभव मिळाले कारण एक दिवस आड बाहेर मुक्काम असायचा परिस्थिती अगोदरच बेताचीच कधीकधी शिळे अन्न खायचंं , तर भजी खाऊनच झोपायचे ट्रेनिंगला पगार नसायचा.
एसटीची पाच वर्षे नोकरी प्रामाणिक केल्याने पाच वर्षाचा विनाअपघात सुरक्षित सेवेचा बिल्ला मिळाला आणि विनाअपघात वर्षाला एक हजाराचं बक्षीस मिळायचं.
नशिबानं कलाटणी दिली तो २५जुलै माझ्या आयुष्यातील काळा दिवस एसटी बसचा मुक्काम करत असताना दुसऱ्या दिवशी बसमधुन उतरताना खाली पडलो पायाचे हाड मोडले आँपरेशन केले अति शहाणा डाँक्टरच्या हालगर्जीपणामुळे आँपरेशन सक्सेस झाल नाही . परत दुसरीकडे आँपरेशन केले. दोनवर्षे अशीच घरी बिना पगारी गेली मेडीकलमधे अनफीट केले .
त्याच काळात आईचे निधन झाले. वडील आणि एक भाऊ अगोदरच त्यांचे निधन झाले होते.
परत एसटी खात्याने सेवा समाप्ती केली .पर्यायी नोकरी साठी अर्ज केला अजुनही नोकरी मिळालेली नाही.
असाच एकदिवस मला माझ्या आयुष्याला वळण देणारा दिवस उजाडला तो म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा दिवस १९ फेब्रूवारी त्याच दिवशी मोबाईलवर एक जाहीरात वाचली एका न्युज चँनलला प्रतिनिधी पाहीजे पाहीजे शिक्षणाची अट नव्हती त्या दिवशी नासिक जिल्ह्यातील मालेगांव मधील मा.राजेंद्र पाटील (राऊत) यांची ओळख मोबाईलवर चँटींग करत करत झाली मला कसलाही पत्रकारीतेचा अनुभव नसताना देखील मला युवा मराठा न्युज चँनलचे सर्वेसर्वा राजेंद्र पाटील (देवमाणूस) यांनी कोल्हापूर जिल्हा ब्युरोचिफ म्हणून निवड केली.
हळुहळु शिकत गेलो वेब साईटच्या बातम्या लावायला शिकलो कोरोना काळात लाँकडाऊनमुळे वेबसाईटला फार महत्त्व आले .
पण ते करत असताना त्यातुन काही मिळगत होत नव्हती कधीकधी परत आचारी काम केले कधी एम आय डि सी त काम केलं पण पायामुळे ते फार काही जमल नाही,काही पडेल ती कामे केली एकदिवस आमचे मुख्य संपादकाना माझी हकिकत समजली मला दोन मुली असल्याचे त्यांना समजले मुलगा होता तोपण नशिबी नव्हता जन्म झाल्यावर तिसऱ्या दिवशी देवाघरी गेला होता . त्यामुळे माझा सद्याचा उदरनिर्वाह काहीच नव्हता घरी बायकोची साथ मोलाची मिळाली शिलाई करत करत कसेबसे चालायचे , एकत्र कुंठुब आम्ही दोघे भाऊ अजुनही एकत्रच आहोत.
भावाची साथ मिळाली एका मुलीची शिक्षणाची जबाबदारी त्यानेच स्विकारली.
त्यानंतर एक असाही दिवस उजाडला तो म्हणजे माझ्या स्वप्नात ही कधी आले नव्हते कि मी संपादक होईन असे, साधा पेपर फोटो यायचा मुश्कील पण आमच्या मुख्य संपादकानी मला साप्ताहिक युवा मराठा हातकणंगले तालुका आवृत्तीला कार्यकारी संपादक पदी निवड करून एक माझ्या जिवनाचे सार्थक केले .!
या सद्याच्या जगात कोण कुणावर विश्वास ठेवत नाही पण एक मराठा दुसऱ्या मराठ्याला जे सहकार्य केले ते खरोखरच आयुष्यात न विसरण्या सारखे आहे. आज मी घटस्थापना ते आज पर्यंत तिसरा अंक काढला आहे . कसलाही पत्रकारीतेचा अनुभव नसताना माझ्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत चांगल्या रितीने , यशस्वीपणे पार पाडली आहे.
आज मला संपादक म्हणून काम करत असताना काही लोकांनी बोलवून अडीअडचणी सोडविण्यासाठी माझ्या नियतीप्रमाणे मी नक्कीच या साप्ताहिक च्या माध्यमातून प्रयत्न करणार आणि कोणावर अन्याय होत असेल तर नक्कीच मी त्यांना न्याय मिळवून देणार.

आज आमच्या दोन एसटी कर्मचाऱ्यांनी पगार न मिळाल्याने , कर्जापोटी आत्महत्या केली आहे.
आत्महत्या हा यावरील पर्याय नसुन एवढ्या टोकाची भुमिका घ्यायला नको होती .
मला दोन वर्षे झाली एसटीचा एक रूपयाही पगार चालू नाही, पण माझ्यावरही दिड लाखाचे कर्ज आहे. पण मी न डगमगता त्याला सामोरे जात आहे मनात जिद्द आणि चिकाटी , धाडस असले की कसलीही जिवनात अडचण येत नाही.

आज माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे कारण कालचा एक एस टी. ड्रायव्हर आजचा संपादक झाला आहे.
याच श्रेय फक्त आणि फक्त आमचे कुटूंब प्रमुख मुख्य संपादक राजेंद्र पाटील (राऊत) यांनाच आहे.
साहेब आपणांस मनापासुन मानाचा मुजरा……. लेखन- मोहन शिंदे कोल्हापूर ,शब्दांकन- श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र

Previous article*जळगांव मधे वाहकाने गळफास* *लावून केली आत्महत्या ,* *चिठ्ठीत लिहले मझ्या आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार*क
Next article🛑 मुंबईकरांना ‘बेस्ट’कडून दिलासा, वाढीव वीजबिलात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here