*पीकविमा व शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी देगलूरला भव्य धरणे आंदोलन…*

0
53

*पीकविमा व शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी देगलूरला भव्य धरणे आंदोलन…*

*अजून तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकरी-कष्टकरी संघर्ष समितीचा इशारा*

देगलूर-मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क मुखेड प्रतिनिधी,)
अतिवृष्टीने झालेली नुकसानी पाहता शासनाने दिलेली हेक्टरी 10 हजार रूपयाची मदत खूपच तुटपुंजी आहे. नदी-नाल्यांमुळे खरडून गेलेल्या जमिनींचा विशेष पंचनामा करून वाढीव मदत जाहीर करावी, देगलूर, मुखेड, बिलोलीसह संपूर्ण नांदेड जिल्हाचा पीकविमा तात्काळ मंजूर करून पीकविमा अदा करावा या व इतर महत्वपूर्ण मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी-कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले.
पीकविमा व वाढीव नुकसानभरपाई सोबतच कर्जमाफी व पीककर्जाची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा, पीकविमा करारातील जाचक अटी रद्द करून 90% जोखीम स्तराने पीकविमा अदा करावी, नुकसानग्रस्त शेतमजूरांनाही दरडोई आर्थिक मदत जाहीर करा, बोगस सोयाबीन बियाणांच्या कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पूर्णवेळ व दिवसा वीज उपलब्ध करून द्या या मागण्यांबाबत धरणे आंदोलनात विस्तृत प्रबोधन करून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या तात्काळ पूर्ण नाही केल्या तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी पीकविमा प्रश्नाचे गाढे अभ्यासक काँ. राजन क्षीरसागर, परभणीचे माणिकराव कदम, शिवाजीराव कदम व संघर्ष समिती, नांदेडचे निमंत्रक कैलास येसगे कावळगावकर यांनी आंदोलना मागची भूमिका विस्तृतपणे विषद करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील, मानवी हक्क अभियानाचे मच्छिंद्र गवाले, शेतकरी पुत्र बालाजी पाटील, किसान सभेचे राजेश्वर पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सुभाष अल्लापूरकर, डाँ. उत्तम इंगोले, जेष्ठ नागरिक संघाचे व्यंकटराव भोसले, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे निशीकांत कांबळे, शेतकरी विठ्ठलराव पाटील, जयदीप वरखिंडे, दशरथ गाडे यांनी भाषणे करून पाठींबा जाहीर केला. या आंदोलनात प्रा. गंगाधर हिंगोले, एच. एस. खंडागळे, राजू पाटील, सुर्यकांत देशमुख, दिपक मोघे, कोंडावार सावकार, प्रशांत देशमुख, विजय पाटील, उत्तम भांजे, शहाजीराव बाबरे, आनंदराव गायकवाड, विष्णूकांत पाटील, प्रविण इनामदार, संजय कांबळे, रामशेट्टी बाळूरे, अँड. अविनाश सुर्यवंशी, संतोष आगलावे, गजानन पाटीलसह देगलूर मुखेड परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी घाळप्पा अंबेसंगे, गंगाधर आऊलवार, मन्मथ काळे, संदिप राजूरे, विकास नरबागे, सुभाष कदम, तानाजी पाटील, दत्ता धर्माजे, माधव पाटील, दिपक रेड्डी, संग्राम आंगडे, दिलीप पाटील, बसवंत पटणे, विनायक पाटील, मारोती पाशमवार, तुकाराम मारकवाड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here